BJP Candidate List : भाजपकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर : चर्चेतील चेहऱ्यांना मागे ठेवून धक्कादायक नावांची घोषणा

BJP Candidate List for Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने 11 जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून भाजपने धक्कातंत्राचा पुन्हा एकदा अवलंब केला आहे.
BJP Candidate List for Vidhan Parishad Election; Devendra Fadnavis
BJP Candidate List for Vidhan Parishad Election; Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

BJP nominees list news : विधान परिषदेच्या १७ जागांच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली असून महायुतीत जागावाटपावरून प्रचंड रस्सीखेच सुरू होती. ही रस्सीखेच थांबली असून जागा वाटपांचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. त्याप्रमाणे भाजपला ११, शिंदेंच्या शिवसेनेला ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा गेल्या आहेत. दरम्यान भाजपने आपल्या ११ जागांवर उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ज्यात बहुचर्चीत अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

नुकताच तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला रामराम करत तनपुरे यांनी भाजप प्रवेश केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. ज्यानंतर त्यांना उमेदवारी मिळेल हे फिक्स होते. चंद्रपूर-गडचिरोली- वर्धा विधान परिषदेच्या जागेवर अरुण लखानी यांना भाजपने तिकीट दिले आहे.

विधानपरिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात अनेक मात्तबरांची नावे समोर आली होती. ज्यानंतर भाजप कोणाला संधी देणार याबाबत अंदाज व्यक्त केले जात होते. दरम्यान ४८ जणांची नावे फायनल करून ती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली होती. यानंतर आज दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर आज रात्री पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी या ११ नावांची घोषणा केली आहे.

BJP Candidate List for Vidhan Parishad Election; Devendra Fadnavis
Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या तोंडावर सामंतांनी सातारमधील शिवसेना-भाजप वादाची वात पेटवली : वाद घातक ठरण्याचा दिला इशारा...

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून ११ जागांची नावे

वर्धा : अरूण लखानी

भंडारा गोंदिया : अविनाश ब्राम्हणकर

अमरावती : प्रवीण पोटे

सांगली सातारा : धैर्यशील कदम

सोलापूर : राजेंद्र राऊत

BJP Candidate List for Vidhan Parishad Election; Devendra Fadnavis
Vidhan Parishad Election : प्रशांत परिचारकांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री फडणवीस, जयकुमार गोरेंना रक्ताने लिहिले पत्र

अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे

संभाजीनगर : सुहास शिरसाट

नांदेड : अमर राजूरकर

धाराशीव लातूर : बसवराज पाटील

जळगांव : नंदकिशोर महाजन

नागपूर : राजीव पोतदार

आता हे सर्व उमेदवार सोमवारी (ता.१) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com