Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या तोंडावर सामंतांनी सातारमधील शिवसेना-भाजप वादाची वात पेटवली : वाद घातक ठरण्याचा दिला इशारा...

Satara Shivsena-BJP Dispute : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सातारा आणि सोलापूरमधील महायुतीतील अंतर्गत वादांवर भाष्य करत हे मतभेद आघाडीसाठी घातक ठरू शकतात, असा इशारा दिला.
Uday Samant
Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Satara, 30 May : विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी उरलेली असतानाच महायुतीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा वादाची वात पेटवली आहे. विशेषतः सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात भाजपकडून मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीला मिळणाऱ्या वागणुकीवर सामंत यांनी परखड भाष्य केले. या दोन जिल्ह्यांत वाद कोणामुळे निर्माण झाले आहेत, हे सर्वांना माहिती आहे. पण हे अंतर्गत वाद महायुतीसाठी घातक ठरू शकतात, असा इशाराही सामंत यांनी भाजपला दिला आहे.

उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील शिवसेना पक्ष संघटनेचा आढावा घेतला. सातारा येथील आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी महायुतीमधील वादावर बोट ठेवले.

सोलापूरमधील पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून निधी आणि सन्मानाची वागणूक मिळत नाही, अशा तक्रार करण्यात आल्या, तर साताऱ्यात (Satara) हातातोंडाशी आलेला जिल्हा परिषदेतील सत्ता घास भाजपने हिरावून नेला. खुद्द पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की करण्यात आली, त्यामुळे साताऱ्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीचा भाजपवर राग आहे, हे अनेकादा लपून राहिलेले नाही.

सामंत म्हणाले, सातारा आणि सोलापुरातील संघटनात्मक परिस्थितीबाबत महायुतीतील मतदार आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान राखण्याची अपेक्षा आहे. काही ठिकाणी निर्माण होणारे अंतर्गत वाद महायुतीसाठी घातक ठरू शकतात, असा सूचक इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.

Uday Samant
Solapur MLC : सोलापूरसाठी भाजपकडून शहाजी पवारांना उमेदवारी?; ZP उपाध्यक्ष बंधूंच्या स्टेट्‌समुळे चर्चेला उधाण

मी फलटणमध्ये कोणाचेही वैयक्तिक नाव घेतले नव्हते, तो इशारा केवळ पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांसाठी होता. प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार नक्कीच आहे, मात्र कोणत्याही व्यक्तीपेक्षा पक्ष नेहमी मोठा असतो, अशा शब्दांत सामंत यांनी पुन्हा एकदा शिवसेना आमदार महेश शिंदेंचा समाचार घेतला.

भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्या कामकाजाच्या शैलीवरही उदय सामंत यांनी कोरडे ओढले. ते म्हणाले, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात भाजप-शिवसेनेत दुरावा वाढतो आहे. या दोन जिल्ह्यांत सध्या अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. ही परिस्थिती नेमकी कोणामुळे निर्माण होते, हे माध्यमांना आणि जनतेलाही चांगलंच माहित आहे. समन्वय आणि परस्पर सन्मान आवश्यक आहे.

सोलापूर व साताऱ्यात शिवसेनेचे ११० पेक्षा जास्त मतदार असून जागा कोणाची हे नंतर ठरेल. पदाधिकाऱ्यांचा सन्मान ठेवणे, हे आमचे काम आहे. शिवसैनिक प्रेमाचा भुकेला असून निधी किंवा कामांचा भुकेलेला नाही. महायुतीच्या घटक पक्षांनी आम्हालाही प्रेम द्यावे. भाजपचे पालकमंत्री म्हणून सर्व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका घ्यायला हवी. महायुती टिकवायची असेल तर घटक पक्षांमध्ये समन्वय आणि परस्पर सन्मान राखणं, आवश्यक आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

Uday Samant
Prajakt Tanpure First Reaction : 'पवारसाहेबांना अन् जयंतरावांना भेटायचं धाडस झालं नाही'; भाजप प्रवेशाआधी प्राजक्त तनपुरे भावूक

शंभूराज देसाईंना मी सॅल्यूट करतो...

विधान परिषदेच्या सातारच्या जागेसाठी आग्रही राहणे गरजेचे आहे. भाजपने पुणे आणि संभाजीनगर मागितले तसे आम्ही शिवसेनेसाठी सातारा आणि कोकण मागितले. संभाजीनगर, जळगाव मागितले. सातारा, सांगली मध्येही अशीच परिस्थिती निर्माण का होत आहे. जिल्हा परिषदेच्या घटना घडामोडीनंतर एखाद्या व्यक्तीने किती सहनशिल आणि सोशिक असावे, याबाबत शंभूराज देसाई यांचे उदाहरण आहे, त्याबद्दल मी त्यांना सॅल्यूट मारतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com