Badlapur News : बदलापूर नगर परिषदेच्या मुख्यालयातच शिवसेना शाखाप्रमुख तथा ठेकेदार भरत नवगिरे आणि भाजपचे नगरसेवक, नियोजन समितीचे सभापती संभाजी शिंदे यांच्यात कामांच्या बिलांवरून झालेल्या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली.
रखडलेली कामांची बिले मंजूर करून घेण्यासाठी शुक्रवारी (ता. ४) दुपारी नवगिरे पालिकेत आले. या वेळी बिलांवरून शिंदे यांच्यासोबत त्यांचे वाद झाले. त्यानंतर या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. कामांची बिले मंजूर करण्यासाठी २५ ते ५० टक्के 'टक्केवारी'ची मागणी केली जात असल्याचा आरोप ठेकेदार भरत नवगिरे यांनी केला आहे.
राजकीय वैमनस्यातून आपली पालिकेतील कामांची बिले जाणीवपूर्वक रखडवली जात असून, विविध समित्यांच्या सभापतींकडून टक्केवारीची मागणी होत असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.
नियोजन समिती सभापती संभाजी शिंदे म्हणाले की, आम्ही टक्केवारीची मागणी केली असेल तर त्यांनी त्याचे पुरावे सादर करावेत. त्यांनी मला धक्काबुक्की करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला असून, या घटनेत मला दुखापत झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कठोर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.