PM Modi Tweet: महाराष्ट्रात पुन्हा भाजपच 'बिग बॉस'; 29 पैकी 21 महापालिकांवर कमळ फुललं; PM मोदींचं पहिलं ट्विट, केलं मोठं विधान

Maharashtra Mahapalika Election: राज्यातील महापालिका निकालात राज्यात भाजप आणि महायुतीला मोठं यश मिळालं आहे. मुंबई, पुणे,पिंपरी चिंचवड,नाशिक,छत्रपती संभाजीनगर सारख्या अनेक मोठ्या महापालिकांमध्ये भाजपाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू आहे.
Devendra Fadnavis, Narendra Modi
Devendra Fadnavis, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. पण या निवडणुकांमध्ये भाजपनं जवळपास 21 महानगरपालिकांवर विजयाचा झेंडा फडकवला आहे. तर चंद्रपूर,वसई-विरार,मालेगाव,ठाणे,लातूर,भिवंडी,अमरावतीत,परभणी या महापालिकांमध्ये काँग्रेस,एमआयएम,बहुजन विकास आघाडी,उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षांनी सत्ता मिळवली आहे. पण महापालिका निवडणुकांमध्ये भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भाजप आणि महायुतीच्या महापालिका विजयानंतर पहिलं ट्विट केलं आहे.तसेच गृहमंत्री अमित शाह यांनीही ट्विट केलं आहे.

राज्यातील महापालिका निकालात राज्यात भाजप आणि महायुतीला मोठं यश मिळालं आहे. मुंबई, पुणे,पिंपरी चिंचवड,नाशिक,छत्रपती संभाजीनगर सारख्या अनेक मोठ्या महापालिकांमध्ये भाजपाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू आहे.अनेक महापालिकेत भाजपची सत्ता आली आहे,तर दुसरीकडे विरोधकांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमधून मोठं विधान करत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यातील निकालावर पहिली प्रतिक्रिया समोर आली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटमधून महाराष्ट्राचे आभार मानले आहे. तसेच राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत! विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

तसेच आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या…महाराष्ट्रभर जनतेसोबत राहून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे.त्यांनी आमच्या युतीच्या कामगिरीबाबत माहिती देताना,आगामी काळासाठीचा आमचा दृष्टिकोन ही अधोरेखित केला आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले.त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा,असं मोदींनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis, Narendra Modi
PMC Election Result 2026 : अजितदादांना सर्वात मोठा धक्का; पहिलवानाचा परफेक्ट डाव; वाचा पुण्यातील विजयी उमेदवारांची नावे...

मोदी पुढे ट्विटमध्ये म्हणतात,आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.हा कौल प्रगतीला अधिक गती देणारा, राज्याशी जोडलेल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे असंही त्यांनी सांगितलं.

तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही महायुतीच्या राज्यातील दणदणीत विजयानंतर ट्विट करत अभिनंदन केलं आहे. त्यात त्यांनी महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला मिळालेलं प्रचंड यश एक गोष्ट स्पष्ट करते. ती म्हणजे आज देशातल्या काना-कोपऱ्यातील जनतेचा विश्वास फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील NDA सरकारच्या विकासाच्या धोरणावरच असल्याचं म्हटलं आहे.

Devendra Fadnavis, Narendra Modi
Pune Mahapalika Results 2026: पुण्यातील भव्य विजयानंतर भाजपचा मोठा निर्णय; महापालिकेनंतर अजितदादांना झेडपीमध्ये नामोहरम करणार!

याचदरम्यान, शाह यांनी हे ऐतिहासिक यश म्हणजे महाराष्ट्रातील महायुती सरकारने विकास आणि जनकल्याणाच्या केलेल्या कार्यांवर जनतेने उमटवलेली पसंतीची मोहोरच. या प्रचंड समर्थनाबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेचे मनापासून आभार! त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह भाजपा-शिवसेनेच्या सर्वच कार्यकर्त्यांचं या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com