Kolsewadi case : पोलीस स्टेशनमधील राड्याप्रकरणी भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड निर्दोष

BJP's Ganpat Gaikwad and Shivsena leader Nilesh Shinde : 2014 साली विधानसभेनंतर भीडलेल्या माजी आमदार गणपत गायकवाड आणि निलेश शिंदे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
BJP's Ganpat Gaikwad and Shivsena leader Nilesh Shinde
BJP's Ganpat Gaikwad and Shivsena leader Nilesh Shindesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड आणि राष्ट्रवादीचे निलेश शिंदे यांच्यात झालेल्या राड्याचा गुन्हा न्यायालयाने फेटाळला.

  2. या प्रकरणातून गायकवाड, शिंदे यांच्यासह पाच जणांना निर्दोष मुक्तता मिळाली आहे.

  3. या निर्णयामुळे स्थानिक राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आले आहे.

Kolsewadi police station brawl : भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांची निदोंष मुक्तता करण्यात आली आहे. 2014 साली विधानसभा निवडणूक नुकतीच संपली होती. कल्याण पूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. तर राष्ट्रवादीकडून निलेश शिंदे यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. वेगवेगळ्या कारणासाठी गायकवाड आणि शिंदे हे दोघे एकाच वेळी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात आले होते. एका कारणावरुन दोघांमध्ये पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरिक्षकांसमोरच राडा झाला. त्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ज्याची केस 11 वर्ष कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होती. या प्रकरणात माजी आमदार गायकवाड आणि शिंदे यांच्यासह पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

2014 साली विधानसभा निवडणूकीनंतर कल्याण पूवेत गुन्हेगारी वाढली होती. राष्ट्रवादीकडून गुन्हेगारीवर अंकूश लावण्याकरीता एक विशाल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व निलेश शिंदे यांनी केले होते. शिंदे या मोर्चाचे शिष्टमंडळ घेऊन कोळसेवाडी पोलिस ठाण्यातील वरिष पोलिस निरिक्षकांच्या केबीननमध्ये गेले होते. याच दरम्यान आमदार गायकवाड हे देखील एका केबल व्यावसायिकाच्या प्रकरणात पोलिस ठाण्यात आले होते.

याचवेळी आमदार गायकवाड आणि शिंदे समर्थकांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर नंतर राड्यात झाले होते. यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी तत्कालीन आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे यांच्यासह काही जणां विरोधात गुन्हा दाखल केला होता. गायकवाड यांचे पुतणे कुणाल पाटील त्यांचे समर्थक विक्की गणात्रायांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या केबीनमध्येच राडा केला होता, त्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर हे प्रकरण कल्याण न्यायालयात गेले होते. जवळपास 11 वर्षे हा खटला न्यायालयात सुरु होता.

BJP's Ganpat Gaikwad and Shivsena leader Nilesh Shinde
Kalyan News : आमदार गायकवाड यांच्या बंधूच्या कार्यालयाची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण; नेमकं काय घडलं?

राजकीय समीकरणे बदलली

2014 सालच्या निवडणूकीत राजकीय समीकरणे बदलली. त्यावेळी निलेश शिंदे यांनी गायकवाड यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. 2024 साली निलेश शिंदे हे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुखपदी होते. पुढे त्यांनीच आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा यांना निवडून आणण्यासाठी काम केले. आत्ता 11 वर्षानंतर कोळसेवाडी राडा प्रकरणाचा निकाल आला आहे.

या प्रकरणात सर्व पाचही आरोपींना निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, अशी माहिती वकिल गणेशा घोलप यांनी दिली आहे. सध्या गायकवाड हे शिवसेना शिंदे गटाचे माजी कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याप्रकरणी तळोजा कारागृहात आहेत.

BJP's Ganpat Gaikwad and Shivsena leader Nilesh Shinde
Uddhav Thackeray News : शिंदेंच्या कार्यकर्त्यांना पळवून लावलं 'त्या' शाखेत उद्धव ठाकरे!

FAQs :

1. कोळसेवाडी प्रकरणात कोणते नेते सामील होते?
भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड आणि राष्ट्रवादीचे निलेश शिंदे.

2. हा राडा कुठे झाला होता?
कोळसेवाडी पोलिस ठाण्यात.

3. पोलिसांनी सुरुवातीला काय कारवाई केली होती?
गायकवाड, शिंदे यांच्यासह काहींवर गुन्हा दाखल केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com