Uddhav Thackeray News : शिंदेंच्या कार्यकर्त्यांना पळवून लावलं 'त्या' शाखेत उद्धव ठाकरे!

ShivSena Vs ShivSena : ठाकरे यांचे स्वागत ढोल-ताशा फुलांच्या पायघड्या घालून करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे येणार असल्याने या शाखेजवळ मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.
Shiv Sena
Shiv Senasarkarnama
Published on
Updated on

Kalyan : उद्धव ठाकरे कल्याणच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना टार्गेट केले आहे. कल्याणमध्ये शिंदे विरोध ठाकरे हा वाद झाला, तेव्हा एकनाथ शिंदेंच्या गटाकडून कल्याणमधील शाखा ताब्यात घेण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, कोळसेवाडीतील शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात मोठा वाद झाला होता. शिंदे गटाला ही शाखा ताब्यात घेण्यात यश आले नव्हते. याच शाखेला उद्धव ठाकरे भेट देणार आहेत.

Shiv Sena
Prithviraj Chavan News : अटल सेतूच्या उद्घाटनावरून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले... ‘अभिनंदन मोदीजी...’

उल्हासनगरची भेट झाल्यानंतर त्याचा कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी या परिसरात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) येणार आहेत. त्यामुळे परिसरात ठाकरे यांचे स्वागत ढोल-ताशा फुलांच्या पायघड्या घालून करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे येणार असल्याने या शाखेजवळ मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.

कोळसेवाडी ही शाखा फार जुनी असल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कल्याण पूर्व येथे कार्यकर्त्यांचा अधिक पाठिंबा मिळतो. शिवसेनेतील फुटीनंतर नंतर कोळसेवाडी शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या कार्यकर्त्यांना पळवून लावले होते. त्यानंतर ही शाखा आमचीच असल्याचा दावा ठाकरे यांनी केला आणि अद्यापही ती शाखा ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी राखून ठेवली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कल्याण शहरात बॅनरबाजी...

पैशांचा माज आलेले लोक लोकशाही संपायला निघाले आहेत. ज्या पक्षांनी ज्या पक्षप्रमुखांनी मोठे केलं त्यांच्याचमुळे अमाप संपत्ती गोळा केली आणि आता त्याच पक्षाला, पक्षप्रमुखाला संपून टाकत आहेत, अशी बॅनर संपूर्ण कल्याण शहरात ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांनी लावले आहेत. आपण एक निष्ठावान सैनिक आहात. अशा परिस्थितीत आपण पेटून उठले पाहिजे आणि सैनिकाप्रमाणे अन्यायाविरुद्ध लढायला तयार झाले पाहिजे, असेदेखील बॅनरवर लिहिले आहेत.

(Edited By Roshan More)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com