BJP News : भाजपच्या महाराष्ट्रातील 74 ‘जिल्हा प्रभारींची’ नियुक्ती जाहीर : लोकसभा 2029 च्या तयारीला सुरुवात

BJP News : भाजपने महाराष्ट्रात 74 जिल्हा प्रभारी नियुक्त केले आहेत. संघटन बळकट करण्यासाठी हा निर्णय घेतला असून आगामी निवडणुकांसाठी पक्षाची तयारी सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
BJP Maharashtra announces 74 district incharges as part of organizational strengthening strategy ahead of upcoming elections.
BJP Maharashtra announces 74 district incharges as part of organizational strengthening strategy ahead of upcoming elections.Sarkarnama
Published on
Updated on

BJP News : भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील संघटनात्मक बळकटीसाठी मोठा निर्णय घेतला असून एकाचवेळी तब्बल 74 ‘जिल्हा प्रभारींची’ नियुक्ती जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून ही फेररचना करण्यात आली असल्याची माहिती आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा या नियुक्त्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी “नवीन जिल्हा प्रभारी आपल्या संघटन कौशल्याचा वापर करून जिल्ह्यातील पक्ष अधिक सक्षम आणि गतिशील करतील”, असा विश्वास या पत्रकात व्यक्त केला आहे.

जिल्हा स्तरावर समन्वय वाढवणे, कार्यकर्त्यांशी संवाद मजबूत करणे आणि पक्षाचा विस्तार साधणे हे या प्रभाऱ्यांचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. या नियुक्तीमुळे आगामी 2029 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक पातळीवर मोठी तयारी सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • कोकण व मुंबई

सिंधुदुर्ग – योगेश सागर

रत्नागिरी उत्तर – प्रशांत ठाकूर

रत्नागिरी दक्षिण – निरंजन डावखे

रायगड उत्तर – अतुल काळसेकर

रायगड दक्षिण – नितेश राणे

ठाणे शहर – विक्रांत पाटील

ठाणे ग्रामीण – केशव उपाध्ये

भिवंडी – अॅड. माधवी नाईक

मीरा-भाईंदर – संतोष जनाटे

वसई-विरार – हेमंत सावरा

नवी मुंबई – शशिकांत कांबळे

कल्याण – जयप्रकाश ठाकूर

उल्हासनगर – नाना सूर्यवंशी

BJP Maharashtra announces 74 district incharges as part of organizational strengthening strategy ahead of upcoming elections.
BJP Politics: लोकसभेला पडलेल्या 5 जणांना मोठी जबाबदारी: पण 'हिंदुत्वा'चा आक्रमक चेहरा पुन्हा दुर्लक्षित, पक्षासोबतच्या गद्दारीचा आरोप राणांना भोवला?
  • उत्तर महाराष्ट्र

पालघर – राणी दिवेदी

नंदुरबार – बबनराव चौधरी

धुळे शहर – भारती पवार

धुळे ग्रामीण – रविंद्र अनासपूरे

मालेगाव – इद्रिस मुलतानी

नाशिक शहर – मंगेश चव्हाण

नाशिक उत्तर – अमोल जावळे

नाशिक दक्षिण – सुजय विखे पाटील

जळगाव शहर – रोहिणी नायडू

जळगाव पूर्व (रावेर) – अनुप अग्रवाल

जळगाव पश्चिम – प्रदीप पेशकार

अहिल्यानगर उत्तर – लक्ष्मण सावजी

अहिल्यानगर दक्षिण – राम सातपुते

अहिल्यानगर शहर – भैरवी वाघ

  • पश्चिम महाराष्ट्र

पुणे शहर – शेखर इनामदार

पुणे उत्तर (मावळ) – रणजितसिंह नाईक निंबाळकर

पुणे दक्षिण (बारामती) – सदाशिव खाडे

पिंपरी-चिंचवड – भरत पाटील

सातारा – राजेश पांडे

सोलापूर शहर – योगेश टिळेकर

सोलापूर पूर्व – गोपीचंद पडळकर

सोलापूर पश्चिम (माढा) – संजय जगताप

कोल्हापूर शहर – विक्रम पावसकर

कोल्हापूर पूर्व (हातकणंगले) – रामकृष्ण वेताळ

कोल्हापूर पश्चिम (करवीर) – पृथ्वीराज पाटील

सांगली शहर – धनंजय महाडिक

सांगली ग्रामीण – वर्षा डहाळे

BJP Maharashtra announces 74 district incharges as part of organizational strengthening strategy ahead of upcoming elections.
BJP News : विधानपरिषद निवडणूक : आमदारकीसाठी भाजपच्या चौघांची फिल्डिंग; दुसरीकडे नितीन गडकरींनी सुचवलं नवीन नाव
  • मराठवाडा

बीड – सुनिल राणे

लातूर शहर – भागवत कराड

लातूर ग्रामीण – मनोज पांगारकर

धाराशिव – अर्चना पाटील चाकूरकर

नांदेड शहर – संभाजी पाटील निलंगेकर

नांदेड उत्तर – किरण पाटील

नांदेड दक्षिण – रेखा कुलकर्णी

परभणी शहर – प्रवीण घुगे

परभणी ग्रामीण – संजय केनेकर

हिंगोली – संजय कौडगे

जालना महानगर – अजित गोपछडे

जालना ग्रामीण – रावराव वडकुते

छ. संभाजीनगर शहर – चैतन्याबापू देशमुख

छ. संभाजीनगर उत्तर – राहुल लोणीकर

छ. संभाजीनगर पश्चिम – प्रीतम मुंडे

  • विदर्भ

बुलढाणा – जयंता ढेहनकर

खामगाव – निवेदिता चौधरी

अकोला शहर – नितीन भुतडा

अकोला ग्रामीण – प्रविण पोटे

वाशिम – रणधीर सावरकर

अमरावती शहर – संजय कुटे

अमरावती ग्रामीण (मोर्शी) – अविनाश देव

अमरावती ग्रामीण (मेळघाट) – विजयराज जाधव

यवतमाळ – सुमित वानखेडे

पुसद – दिनेश सूर्यवंशी

वर्धा – संजय भेंडे

नागपूर शहर – परिणय फुके

नागपूर ग्रामीण (रामटेक) – राजीव पोटदार

नागपूर ग्रामीण (काटोल) – सुधाकर कोहळे

भंडारा – रामदास तडस

गोंदिया – प्रवीण दटके

गडचिरोली – कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया

चंद्रपूर शहर – अर्चना डेहनकर

चंद्रपूर ग्रामीण – चेनसुख संचेती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com