
BJP News : सत्ताधारी भाजपमध्ये सध्या मोठ्या प्रमाणत पक्षप्रवेश सुरु आहेत. बुधवारी (10 जून) भाजपच्या कार्यालयात प्रवेशासाठी मोठी गर्दी जमली होती. कालच्या एका दिवसातच भाजपमध्ये बड्या नेते आणि त्यांचे कार्यकर्ते अशा शेकडो जणांचा पक्षप्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक दिवस खास पक्ष प्रवेशांसाठीच राखीव ठेवला होता.
बुधवारी भाजपच्या पक्ष कार्यालयात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजीत पाटणकर यांचा पक्ष प्रवेश पार पडला. त्यांच्यासोबत कोयना शिक्षण संस्थेचे संचालक याज्ञसेन पाटणकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हिंदुराव पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश पवार, पाटण पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ शेलार, पाटण नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सचिन कुंभार, पाटण अर्बन बँकेचे माजी चेअरमन दिनकरराव घाडगे या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कमळ हाती घेतले.
याशिवाय पाटण तालुका दूध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार, युवानेते अभिजीत पाटील, राजे संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पाटणकर, माजी उपसभापती रमेश मोरे, पाटण अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन रविंद्र ताटे, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन बाळासाहेब राजेंमहाडिक, पाटण तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अविनाश जानुगडे, खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन हणमंतराव खबाले पाटील, माजी उपसभापती प्रताप देसाई, शंकरराव शेडगे, समीर कदम, साहेबराव गायकवाड, निवास शिंदे, अमर पवार आदी पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
त्यापाठोपाठ माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे चिरंजीव वैभव पाटील यांचाही पक्षप्रवेश पार पडला. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमरावती जिल्हा प्रमुख सुनिल खराटे, शेतकरी सेनेचे प्रदेश समन्वयक अनिल लोहकपुरे आणि विविध पदाधिकाऱ्यांनी भाजपला आपलेसे केले. तसेच काँग्रेस (आदिवासी विभाग) प्रदेश उपाध्यक्ष आणि इगतपुरीचे माजी सभापती गोपाळ लहांगे आणि नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शकुंतलाताई डगळे, नाशिक आणि इगतपुरी परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि माजी सरपंच यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, या पक्ष प्रवेशांमुळे भाजपची ताकद वाढत असल्याचे नेते सांगत आहेत. पण दुसऱ्या बाजूला पक्षातील जुने आणि अनुभवी नेते अस्वस्थ होत आहे. आपली संधी कमी होत आहे, आपल्याला डावलले जात आहे, अशी भावना जुन्या नेत्यांमध्ये तयार होत आहे. शिवाय प्रवेश केलेल्या नव्यांनाही संधी देताना पक्षाची दमछाक होणार आहे. त्यामुळे जुन्या आणि नव्यांचा समतोल साधणे, सर्वांना संधी देणे हे आजघडीचे भाजपसमोर मोठे आव्हान असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.