NCP SP : भाजपने दुर्लक्ष केलेल्या ढोबळेंवर राष्ट्रवादीकडून आणखी महत्वाची जबाबदारी; पित्यानंतर मुलीलाही प्रदेशवर संधी!

Adv Komal Dhoble News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲड. कोमल ढोबळे साळुंखे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेश उपाध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Laxman-Dhoble-Komal Dhoble
Laxman-Dhoble-Komal DhobleSarkarnama
Published on
Updated on
  1. कोमल ढोबळे साळुंखे यांना मानाचे पद:
    माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या कन्या ॲड. कोमल ढोबळे साळुंखे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  2. ढोबळे कुटुंबाचा राष्ट्रवादीत प्रभाव वाढला:
    प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्यानंतर त्यांच्या कन्येलाही प्रदेशस्तरीय जबाबदारी मिळाल्याने ढोबळे कुटुंबाचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रभाव वाढला आहे.

  3. बहुजन रयत परिषदेचा अनुभव फायद्याचा:
    कोमल ढोबळे यांनी बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून केलेले संघटनात्मक काम पक्षवाढीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास पक्षनेत्यांनी व्यक्त केला आहे.

Mangalvedha, 10 November : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सर्वच राजकीय पक्षांनी संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्यादृष्टीनेच माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची कन्या ॲड कोमल ढोबळे साळुंखे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. ढोबळे यांची यापूर्वीच प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने दुर्लक्ष केलेल्या ढोबळेंचा पवारांच्या पक्षाकडून पुन्हा एकदा मानाचे पान देण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) यांनी भारतीय जनता पक्षातून स्वगृही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. ढोबळे यांच्यासोबत त्यांची बहुजन रयत परिषदही राष्ट्रवादीत सामील करण्यात आली आहे. या परिषदेच्या प्रमुख ॲड कोमल ढोबळे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते ॲड ढोबळ-साळुंखे याना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.

मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची (NCP SP) बैठक झाली. त्या बैठकीतच कोमल ढोबळे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढोबळे, भैरवनाथ उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अनिल सावंत, जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख, तालुकाध्यक्ष पांडुरंग चौगुले, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, मतदारसंघ अध्यक्ष संतोष रंधवे उपस्थित होते.

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी राज्य स्तरावर बहुजन रयत परिषदेची स्थापना केली होती. या परिषदेच्या जबाबदारी ॲड कोमल ढोबळे-साळुंखे यांच्याकडे दिली होती. ती जबाबदारी चोखपणे सांभाळणाऱ्या कोमल ढोबळे साळुंखे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Laxman-Dhoble-Komal Dhoble
Karmala Nagarpalika : जयवंतराव जगतापांच्या 30 वर्षांच्या गडाला सुरुंग लावण्याची विरोधकांची खेळी; भाजपच्या झेंड्याखाली एकत्र येणार

महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष ॲड रोहिणी खडसे यांच्या सहीचे पत्र खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते देण्यात आले आहे. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान,आमदार जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अभिप्रेत असलेली संघटना बांधण्यासाठी आपण प्रयत्न कराल. पक्षवाढीबरोबर, पक्षाची ध्येय धोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशा शुभेच्छाही अध्यक्ष ॲड रोहिणी खडसे यांनी दिल्या आहेत.

Laxman-Dhoble-Komal Dhoble
Rohit Pawar Vs Jaykumar Gore : जयकुमार गोरेजी आपण आधीच उघडे पडलात....आहे का हिंमत? : रोहित पवारांचा पलटवार

ॲड कोमल ढोबळे या उच्चशिक्षित असून त्यांनी बहुजन बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून राज्यस्तरीय संघटना बांधल्यामुळे त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला भविष्यात पक्ष वाढीसाठी निश्चितपणे होणार आहे.

Q1: ॲड. कोमल ढोबळे साळुंखे यांना कोणते पद मिळाले?
A1: त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली.

Q2: नियुक्तीपत्र कोणाच्या हस्ते देण्यात आले?
A2: खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

Q3: कोमल ढोबळे यांची संघटनात्मक पार्श्वभूमी काय आहे?
A3: त्यांनी बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून राज्यस्तरीय संघटना उभी केली आहे.

Q4: ढोबळे कुटुंबाचा पक्षात सहभाग का महत्त्वाचा मानला जातो?
A4: कारण प्रा. लक्ष्मण ढोबळे आणि कोमल ढोबळे दोघांनाही प्रदेशस्तरीय जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत, ज्यामुळे पक्षात त्यांचा प्रभाव वाढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com