

Maratha Reservation News: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवली सराटी येथे आंदोलन सुरू आहे. या प्रश्नावर नाशिक जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकारला या प्रश्नावर तातडीने पावले टाकण्याचा इशारा देण्यात आला.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. गेल्या 14 दिवसात याबाबत सरकारनने चर्चेत वेळ काढू धोरण स्वीकारणे आहे. त्यामुळे आंदोलनाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही.
या प्रश्नावर आता मराठा समाजातही अस्वस्थता पसरली आहे. नाशिक शहरात एसईबीसी या विषयावर वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न झाला होता. बुधवारी चांदवड येथे मराठा समाज एकवटलेला दिसला.
चांदवड येथे सर्वपक्षीय आंदोलकांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखला. यावेळी आंदोलकांच्या भावना तीव्र असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनाने चांदवड शहर आणि परिसरात वातावरण तापले.
मराठा समाजाच्या या आंदोलनात आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाचा निषेध करण्यात आला. शासन ठोस भूमिका घेत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सरकारने या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाची तीव्रता आणखी वाढविण्याचा इशारा देण्यात आला.
आंदोलनात सत्ताधारी पक्षाचे अनेक नेते सहभागी झाले होते. मनमाड उपविभागीय अधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात आले. भाजपचे डॉ आत्माराम कुंभार्डे, माजी आमदार शिरीष कोतवाल, प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर, विलास पवार, मनोज शिंदे, नगरसेवक राहुल कोतवाल, संजय जाधव, वाल्मीक वानखेडे यांसह मोठ्या संख्येने विविध पक्षाचे नेते आंदोलन सहभागी झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.