Jan Akrosha Morcha in Mumbai : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली होती. यानंतर राज्यभर आता संताप व्यक्त होणारे आक्रोश मोर्चे होत आहे. या हत्याप्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. त्याला अटक करण्यासह देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, वाल्मिक कराड याची प्रॉपर्टी जप्त करा, अशा मागण्या राज्यातील जनता करत आहे. अशातच या हत्याकांडाची सखोल चौकशी होण्याबरोबरच आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबईतील जनआक्रोश मोर्चात पुढे आली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मुंबई मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय. त्यांच्या भगिनी प्रियांका चौधरींसह मराठा क्रांती मोर्चाचे सदस्यांसहित भाजपचे आमदार सुरेश धस सहभागी झाले होते.
यावेळी धस यांनी, या प्रकरणात फक्त धनंजय देशमुख समाधानी आहेत असे नाही तर या प्रकरणाने राज्यातील 14 कोटी जनतेच्या मनाला लागलेलं हे प्रकरण आहे. तर 14 कोटी जनतेच्या मनातील हा राग आता विविध जिल्ह्यात आक्रोश मोर्चातून दिसत आहे. त्यामुळे ज्या दिवशी या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी दिली जाईल. त्याच दिवशी समाज मन शांत होईल असे धस यांनी म्हटलं आहे.
तसेच यावेळी धस यांनी महादेव मुंडे यांचा खूनावरून वाल्मिक कराडवर निशाना साधला आहे. तसेच या प्रकरणात पोलिस नेमक काय करत होती? पोलिसांवर आकाचा दबाव होता का असे सवाल उपस्थित केले आहे. यावेळी धस यांनी, दीड वर्ष पूर्ण होत असून महादेव मुंडे यांची हत्या झाली होती. मात्र आद्याप आरोपी सापडत नाहीत. ज्याचा बाप गेला आहे. तो डोळ्यात पाणी आणून न्यायाची वाट पाहत आहे. मात्र अद्यापही पोलिसांना तपास करता येत नाही, यावरून आकाची दहशत, त्याचा किती प्रभाव तिथल्या पोलिस दलावर होता हे आता उघड होत आहे.
भास्कर केंद्रे यावरून देखील बोट ठेवताना हा पोलिस एकाच ठिकाणी 15 वर्ष कसा राहतो असा सवाल देखील धस यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
या प्रकणातील धागेदोरे प्रॉपर्टी अटॅचमेंट केल्याशिवाय निघणार नाहीत. प्रॉपर्टी फक्त आकाच्या नावे नाही, तर आका, बाका, चुका, तुका आणि सखा अशा अेक लोकांच्या नावावर संपत्ती आहे. पण आता आकाच आत गेल्यामुळे प्रॉपर्टी दुसऱ्यांच्या नावावर करण्याचे काम सुरू आहे, असा दावा ही धस यांनी केला आहे. तर या कालावधीत जर अशा आकाशी निगडीत प्रॉपर्टी शिप्ट झाल्या तर त्या जप्त करण्यात याव्यात अशाही मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.