Narayan Rane : नारायण राणेंनी पुन्हा ठाकरे बंधुंना डिवचलं, बोचरी टीका करत म्हणाले, 'कशाला अपशकुन...'

Narayan Rane On Thackeray Brothers : तळ कोकणातील भाजपचे खासदार माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. आताही त्यांनी गणेशोत्सावाच्या वेळीही टीका केली आहे.
Uddhav Thackeray And Raj Thackeray
Uddhav Thackeray And Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. भाजप खासदार नारायण राणे यांनी पुन्हा ठाकरे बंधूंवर टीका करत त्यांचं राजकारण संपल्याचं म्हटलं.

  2. उद्धव-राज ठाकरे एकत्र आले तरी फरक पडणार नाही, असं राणेंनी स्पष्ट केलं.

  3. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी केलेल्या या वक्तव्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Mumbai News : भाजप खासदार नारायण राणे यांनी ठाकरें बंधुंवर बोचरी टीका केली होती. त्यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांचे राजकारण संपले असून त्यांच्या दोघांच्या एकत्र आल्याने काहीच फरक पडणार नसल्याचे म्हटले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी ठाकरे बंधुंना डिवचले असून त्याच्या एकत्र येणाऱ्यावर निशाना साधला आहे. राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र त्यांचं राजकारण संपलय, आम्हाला काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी गणेशोत्साच्या पहिल्याच दिवशी ठाकरे बंधुंवर टीकास्त्र सोडल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

राणे यांनी दोनच दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यांनी ठाकरे बंधुंनी बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत केलेल्या युतीच्या चाचणीवर टोला लगावला होता. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर लिटमस टेस्ट ठरणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला होता. त्यावर राणेंनी जोरदार निशाना साधला हल्लाबोल केला होता. ठाकरेंचे आता राजकारणच संपलं असून त्यावर बोलण्यात रस नसल्याचे ते म्हटले होते. त्यामुळे राजकीय वातावरण तापले होते.

Uddhav Thackeray And Raj Thackeray
Narayan Rane : मनसे-शिवसेना युतीच्या चर्चेला राणेंचा करारा टोला; म्हणाले, 'त्याचं राजकारण संपलं, कशाला दाखवता?, जे बेस्टमध्ये झालं...'

यानंतर आता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही होते. यानंतर आता आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे.

याच चर्चांवर राणेंना छेडले असता त्यांनी पुन्हा ठाकरे बंधुंवर टीका केली आहे. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत की नाही यात मला रस नाही. त्यांचे राजकारण संपले आहे. एका व्यक्तीने दुसऱ्याच्या घरी भेट दिली तर काय फरक पडतो? राज्यात असे किती भाऊ एकत्र येतात. त्याने काही फरक पडत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच ज्या पत्रकाराने हा प्रश्न विचारला त्याला देखील राणेंनी चांगलेच झापले आहे. गणपती बाप्पांचे आगमणाच्या वेळी हा प्रश्न त्यांना विचारल्याने ते चांगलेच संतापले. त्यांनी थेट त्या पत्रकाराला ते एकत्र येत आहेत. त्यात तुला काय. कशाला अपशकुन असे म्हणत शब्द अवरते घेतल्याचेही पाहायला मिळत आहे.

Uddhav Thackeray And Raj Thackeray
Narayan Rane Clean Chit: नारायण राणेंना दोन गुन्ह्यांमध्ये क्लीनचीट! उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नेमकं काय घडलं होतं?

FAQs :

प्रश्न 1: नारायण राणे यांनी ठाकरे बंधूंवर काय विधान केलं?
उत्तर: त्यांनी म्हटलं की, उद्धव-राज ठाकरे यांचं राजकारण संपलं असून त्यांच्या एकत्र येण्याने काही फरक पडणार नाही.

प्रश्न 2: हे विधान कधी करण्यात आलं?
उत्तर: गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हे विधान करण्यात आलं.

प्रश्न 3: या विधानामुळे काय परिणाम होऊ शकतो?
उत्तर: यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

प्रश्न 4: राणे यांनी यापूर्वीही अशी टीका केली होती का?
उत्तर: होय, त्यांनी दोन दिवसांपूर्वीही ठाकरे बंधूंच्या राजकारणावर बोचरी टीका केली होती.

प्रश्न 5: राणेंचं विधान कोणत्या पक्षाविरोधात होतं?
उत्तर: शिवसेना (उद्धव गट) आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या ठाकरे बंधूंच्या राजकारणावर होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com