Narayan Rane Clean Chit: नारायण राणेंना दोन गुन्ह्यांमध्ये क्लीनचीट! उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नेमकं काय घडलं होतं?

Narayan Rane Clean Chit: अलिबाग आणि पुण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांना अटकही झाली होती, पण पोलिसांनी या दोन्ही फाईल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Narayan Rane Uddhav Thackeray
Narayan Rane Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Narayan Rane Clean Chit: भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर अलिबाग आणि पुण्यात दाखल करण्यात आलेल्या दोन्ही गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी क्लीनचीट दिली आहे. हे दोन्ही गुन्हे रद्द करण्यात यावेत यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टात धावही घेतली होती. पण तत्पूर्वीच पोलिसांनी या प्रकरणांची फाईल बंद करण्याचा निर्णय घेतल आहे.

Narayan Rane Uddhav Thackeray
Raksha Khadse Help: संभाजीनगरच्या कुटुंबावर पॅरिसमध्ये ओढवला बिकट प्रसंग! रक्षा खडसे मदतीला धावून आल्या अन्...

काय आहे प्रकरण?

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांनी त्यांच्यावर एक आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानामुळं मोठं वादंग निर्माण झालं होतं, त्यामुळं अलिबाग पोलिसांनी नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. तसंच त्यांच्यावर अटकेची कारवाई देखील केली होती. त्याचबरोबर पुण्यातही त्यांच्यावर याच प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल झाला होता. हे दोन्ही गुन्हे करण्यासाठी नारायण राणेंनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती.

दरम्यान, अलिबाग पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये सी समरी रिपोर्ट दाखल करुन या प्रकरणाची फाईल बंद केली आहे. त्याचबरोबर पुण्यातही पोलीस अशाच प्रकारचा रिपोर्ट दाखल करुन ती फाईल देखील बंद करणार आहेत, अशी माहिती खुद्द राज्य सरकारनं हायकोर्टात दिली आहे. त्यामुळं हायकोर्टात दाखल केलेली याचिका आता नारायण राणे यांनी मागे घेतली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये त्यांच्याविरोधात कोणतेच पुरावे आढळलेले नाहीत, असं पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल करताना म्हटलं आहे.

Narayan Rane Uddhav Thackeray
Mahapalika Elections: ...तर एकत्र लढू हे सांगता येणार नाही; काँग्रेसनं स्पष्ट केली भूमिका

राणे नेमकं काय म्हणाले होते?

तीन वर्षांपूर्वी २४ ऑगस्ट २०२१ रोजी नारायण राणेंनी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कोरोनाच्या काळाच वाईट काम केल्याचा आरोप करत कडवट टीका केली होती. त्याच बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात संबोधित करताना देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली? हे विसरल्याचं सांगत "मी तिथं असतो तर त्यांच्या कानशिलात लागवली असती" असं मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर मोठं वादंग निर्माण झालं होतं. यानंतर त्यांच्यावर महाड, पुणे आणि नाशिक इथं शिवसैनिकांनी गुन्हे दाखल केले होते. अलिबाग पोलिसांनी त्यांना याप्रकरणात अटकेची कारवाई देखील केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com