बंडखोरांचा जीव टांगणीला.. पण भाजप नेते हालचाल करेनात...

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे पुरेसे संख्याबळ होऊनही सत्ता बदलाच्या हालचाली दिसेनात..
Shivsena Mlas With Eknath Shinde In Surat
Shivsena Mlas With Eknath Shinde In SuratSarkarnama
Published on
Updated on

पुणे : शिवसेनेच्या 40 बंडखोर (Shiv sena) आमदारांचा जीव सध्या गुवाहटीत टांगणीला लागला आहे. अपेक्षेप्रमाणे सत्ता बदलाच्या हालचाली होत नसल्याने त्यांच्यात चिंता लागून राहिली आहे. गुवाहटी येथील रॅडीसन हाॅटेलच्या खोल्या 30 जूनपर्यंत बुक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याचा अर्थ आणखी सात दिवस तरी या आमदारांचा मुक्काम तेथेच असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र तोपर्यंत आमदारकीसाठी आपण अपात्र ठरलो तर काय, ही चिंता बंडखोरांना सतावत आहे. (Eknath Shinde Latest news)

Shivsena Mlas With Eknath Shinde In Surat
शिवबंधन तुटले... त्याला ठाकरे जबाबदार नाहीत?

बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 17 आमदारांना अपात्र करण्याच्या हालचाली शिवसेनेने सुरू केल्या आहेत. त्याचे उत्तर देण्यातच या गटाचा वेळ जात आहे. प्रत्यक्षात शिंदे यांच्या गटाची नोंदणी करणे, राज्यपालांना तसे कळविणे, त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढणे या बाबी घडायच्या आहेत. हे घडल्यानंतर ठाकरे सरकारचे बहुमत सिद्ध करणे, त्या साठीच्या सर्व करामती आणि त्यानंतर भाजपसोबत सरकार स्थापन करणे, अशी सारी प्रक्रिया आहे.

या साऱ्या नाट्यात भारतीय जनता पक्षाची प्रमुख भूमिका आहे. मात्र या पक्षाने हे बंड शिवसेनेतील अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत त्यापासून दूर राहण्याची भूमिका घेतली आहे. या बंडानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहेत. बंड होऊन शंभर तास उलटून गेले तरी फडणवीस यांनी चकार शब्द काढलेला नाही. सत्तांतर नाट्यात राज्यपालांची भूमिका महत्वाची असणार आहे. ते कोरोनाने आजारी असणेही बंडखोरांसाठी अडचण ठरली आहे.

Shivsena Mlas With Eknath Shinde In Surat
कृषीमंत्री दादा भुसेंना एकनाथ शिंदे यांनीच ठाकरे गोटात ठेवले होते?

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अपक्ष आमदारांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न भाजपने चालवला आहे. मात्र त्यावर कधी निर्णय होणार, याची काळजीही या बंडखोरांना आहे. तोपर्यंत झिरवळ यांना बंडखोरांना अपात्र ठरवले तर अडचण वाढू शकते. त्यामुळेच आता लवकर सत्ता स्थापनेचा मुहूर्त बघा, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे हे दोन तासांसाठी हाॅटेलमधून बाहेर पडले होते. ते कुठे गेले, याची उत्सुकता सर्वांनाच होती. कामाख्या मंदिरात दर्शनासाठी ते गेले किंवा आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ते बाहेर पडले होते, अशी चर्चा होती. ते दिल्लीला भाजप नेत्यांना भेटण्यासाठी जाणार असल्याचेही बोलले जात होते. मात्र त्याबाबत कोणताच खुलासा न झाल्याने शिंदे यांची पुढील रणनीती काय असणार, याकडेही लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com