Fact Check : रवींद्र चव्हाण MIM चे नेते इम्तियाज जलीलांच्या पाया पडले, व्हिडिओ व्हायरल, CM फडणवीसही उपस्थिती; सत्य नेमकं काय?

Ravindra Chavan Imtiaz Jaleel Viral Video : रवींद्र चव्हाण हे भाजपच्या सभेत एमआयएमच्या नेत्याच्या पाया पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे. या व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर सत्य समोर आले आहे.
 Ravindra Chavan AIMIM Imtiaz Jaleel Viral Video Fact Check
Ravindra Chavan AIMIM Imtiaz Jaleel Viral Video Fact Check sarkarnama
Published on
Updated on

Ravindra Chavan News : अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमच्या युतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिडले होते. थेट स्थानिक आमदारावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. एमआयए आणि भाजपची युती तुटली. मात्र, सोशल मीडियावर भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेत एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आले आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांचा पाया पडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये भाजप नेते एमआयएमच्या नेत्यांसमोर झुकले असा दावा केला जात आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अखिल चित्रे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, उल्हासनगरच्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षाने MIM च्या नेत्याचे पाय धरले. खरं तर भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना, मतदारांना संदेश दिला आहे, “अब MIM के सामने झुकेंगे तोही बचेंगे”... एक स्पष्ट झालं BJP MIM एक है इस्लिए सेफ है"

या व्हिडिओ अनेक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. मात्र, या व्हिडिओ सत्यता वेगळीच असल्याचे पडताळणीमध्ये समोर आले आहे. या व्हिडिओतून चुकीची माहिती पसरवली जात आहे.

चव्हाण पाया पडले ती व्यक्ती कोण?

ज्या नेत्याच्या पाया रवींद्र चव्हाण पडत आहेत. ते एमआयएमचे नेते इम्तियाज जलील नाहीत, असे स्पष्ट झाले आहेत. ज्यांच्या पाया पडले त्यांचे नाव छोटू साई असे आहे. ते उल्हासनगरमधील सिंधी समाजाचे गुरू आहेत.

 Ravindra Chavan AIMIM Imtiaz Jaleel Viral Video Fact Check
BJP Trouble : 'त्या' महिला अधिकाऱ्याची चूक भाजपला महागात पडणार? ऐन निवडणुकीत विरोधकांकडून टार्गेट!

उल्हासनगरमधील सभेतील घटना

उल्हासनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होती. या सभेला साई वसतशाह दरबाराचे छोटू साई हे देखील उपस्थित होते. ते मंचावर आले असता रवींद्र चव्हाण यांनी त्यांना आदर देत त्यांच्या पाया पडले. मात्र, हा व्हिडिओ रवींद्र चव्हाण हे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या पाया पडले, अशी चुकीची माहिती देत सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील काही नेत्यांकडून देखील हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

 Ravindra Chavan AIMIM Imtiaz Jaleel Viral Video Fact Check
ZP Teacher Transfer: शिक्षकांसाठी महत्वाची बातमी: 12 हजार शिक्षकांना मिळणार लाभ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com