
Mumbai news : आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. त्यातच आता महायुतीमधील घटक पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार की एकत्रित निवडणूक लढणार याची उत्सुकता लागली आहे. त्यातच आता महायुतीमधील घटक पक्षातच युतीवरून कलगीतुरा रंगला आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी आमची भाजपासोबत नैसर्गिक युती आहे, असे युतीबाबत विधान करीत वाद ओढवून घेतला आहे.
त्यानंतर सामंत यांच्या विधानाचा समाचार मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. 1988-89 साली शिवसेना-भाजपची युती झाली. त्यावेळी काय घडले होते याचा इतिहास सांगत सामंतांना खडे बोल सुनावले आहेत.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (uday samant) यांनी एका कार्यक्रमावेळी बोलताना राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील युती ही नैसर्गिक नाही. ती राजकीय तडजोड आहे, असा आरोप केला होता. सामंत असे का म्हणाले? असा प्रश्न पत्रकारांनी छगन भुजबळ यांना विचारला होता. त्यावर भुजबळ यांनी नैसर्गिक आणि अनैसर्गिक काय असते? हे सामंत यांनाच विचारावे लागेल, असे स्पष्ट करीत भुजबळांनी टीका केली आहे.
भाजप आणि शिवसेना (Shivsena) यांची नैसर्गिक युती आहे. आमच्या महायुतीत मनसेसारखे अन्य पक्ष येणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. आमची भाजपसोबतची युती ही नैसर्गिक आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत अनेकदा भाष्य केले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आमची राजकीय तडजोड आहे, असे उदय सामंत म्हणाले होते. त्यामुळेच सामंत यांनी केलेले सर्व आरोप भुजबळ यांनी फेटाळून लावले आहेत.
चौघांनी केली होती युतीची चर्चा
1988-89 साली भाजप आणि शिवसेनेची युती झाली होती. ही युती होत असताना अनेक अडचणी आल्या होत्या. मी आणि शिवसेनेचे दिवंगत नेते मनोहर जोशी तसेच भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे असे चार जण युतीच्या चर्चेत सहभागी झाली होतो. आम्ही एकत्र बसलो आमच्यात अनेक बैठक झाल्या त्यांनतर एका महिन्यात युती घडवून आणली, असा इतिहास छगन भुजबळ यांनी सांगितला.
त्यावेळी भाजप नेत्याचा विरोध होता
भाजप-शिवसेना युतीची बोलणी सुरु असताना भाजपाच्याच काही नेत्यांचा याला विरोध होता. भाजप हा देशपातळीवरचा पक्ष आहे आणि शिवसेना हा राज्यपातळीवरचा पक्ष आहे, त्यामुळे ही युती नको, असे भाजपचे काही नेते सांगत होते. मात्र, भाजपाचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी एक संदेश पाठवला होता. बाळासाहेब आपके पास भुज’बळ’ है, तो हमारे पास बुद्धिबळ है, हमे दोनो एक हो जायेंगे तो चमत्कार हो जायेगा, असा संदेश पाठवला होता. त्यानंतर युती झाली अशी माहिती भुजबळ यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.