Mahayuti seat sharing: विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट! महायुतीत बिघाडी; 'या' मतदारसंघात भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का?

MLC Election News : विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहवयास मिळत असून महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. यवतमाळ विधानपरिषद मतदारसंघात भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai news : राज्यात 17 जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीत जोरदार रस्सीखेच दिसत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच दित आहे. त्यातच महायुतीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटपाची चर्चा सुरुक असल्याने काही ठिकाणी महायुतीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यातच विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहवयास मिळत असून महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. यवतमाळ विधानपरिषद मतदारसंघात भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून त्यामध्ये भाजप (BJP) 11, एकनाथ शिंदेंची शिवसेना 4 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 2 जागा आल्या आहेत. आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपची ताकद अधिक असल्यामुळे भाजपने 14 जागा लढवाव्यात, अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून सुरू होती, मात्र भाजपने युती धर्म पाळत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 4 जागा दिल्या आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. लढण्याची संधी असूनही अडचण वाढली आहे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
MLC Election : 'विधानपरिषदेची सातारा-सांगलीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे : दोन माजी मंत्र्यांमध्ये उमेदवारीची चुरस

महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असला तरी यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आल्याचचे पहायला मिळत आहे. महायुतीमध्ये ही जागा एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. मात्र, तरी देखील या जागेसाठी आता भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा सॊमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, यावरून आता चर्चेला उधाण आले आहे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
BJP Politics : भाजपकडून एकनाथ शिंदेंचा 'करेक्ट कार्यक्रम', दिल्लीवारी देखील ठरली फेल?

यवतमाळमध्ये भाजप-शिवसेनेमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून सूचना आल्याने उमेदवारी दाखल करणार असल्याचे यावेळी भुतडा यांनी स्पष्ट केले आहे. जर मला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले तर मी परत घेईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. मी बंडखोरी करत नाही, पक्षाचा आदेश आहे तो पूर्ण करत आहे, असे यावेळी भुतडा यांनी म्हटले आहे. दरम्यान नितीन भुतडा यांच्या उमेदवारीमुळे आता महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
MLC election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढणार!; 'या' दोन जागांवर माविआ भाजपला देणार मोठा झटका? पडद्यामागे तगडी फिल्डिंग!

दरम्यान, महायुतीच्या जागावाटपानुसार भाजप सर्वाधिक 11 जागा लढणार आहे. हे जवळपास निश्चित झाले आहे. तर एकनाथ शिंदे याच्या शिवसेनेला 4 जागा दिल्या जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात दोन जागा पडणार आहेत. रायगड आणि पुणे अशा दोन जागा राष्ट्रवादीला मिळणार आहेत.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
MLC election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढणार!; 'या' दोन जागांवर माविआ भाजपला देणार मोठा झटका? पडद्यामागे तगडी फिल्डिंग!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com