BJP Assembly Candidates : भाजपच्या पहिल्या यादीचा मुहूर्त ठरला; 'या' तारखेला होऊ शकते 50 उमेदवारांची घोषणा ?

Political News : महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरु आहे. जवळपास 168 जागांवरील तिढा सुटला असून या जागांचे वाटपही जवळपास ठरले आहे. त्यामध्ये भाजप 160 जागा लढणार असल्याचे समजते.
Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin Gadkari
Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करीत आहेत. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा जोरात सुरु आहे.

भाजपने त्यामध्ये आघाडी घेतली असून जवळपास 50 जणांची उमेदवारी फायनल केली असून पाहली यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. पितृपक्ष संपल्यानंतर भाजपची (BJP) पहिली यादी येण्याची शक्यता आहे. घटस्थापना झाल्यानंतर म्हणजेच 3 ऑक्टोबरनंतर ही पहिली यादी जाहीर होऊ शकते. (BJP News)

भारतीय जनता पक्षासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत महायुतीचे जागावाटप अद्याप निश्चित झालेले नाही. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरु आहे. जवळपास 168 जागांवरील तिढा सुटला असून या जागांचे वाटपही जवळपास ठरले आहे. त्यामध्ये भाजप 160 जागा लढणार असल्याचे समजते. त्यामुळे भाजपने अगदी घेत 50 जागांवरील उमेदवार फायनल केले आहेत. त्याची लवकरच घोषणा केली जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीत ही भाजपने प्रचारात आघाडी घेत पहिल्या दोन याद्या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच जाहीर केल्या होत्या. मात्र आता त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीची घोषणा दसऱ्यानंतर होणार आहे. तत्पूर्वी भाजपच्या उमेदवाराची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. 50 जणांची पहिली उमेदवारी यादी तयार आहे. दरम्यान, पितृपक्ष संपल्यानंतर भाजपची पहिली यादी येण्याची शक्यता आहे. घटस्थापना झाल्यानंतर म्हणजेच 3 ऑक्टोबरनंतर ही पहिली यादी जाहीर होऊ शकते. यात 50 उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin Gadkari
Mahayuti News : लाडक्या बहिणींचे देवेंद्र मोठे तर एकनाथराव लहान भाऊ; बीडच्या पोस्टरमधून अजित पवार तर गायबच

विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले होते. त्यानुसार 10 ते 20 नोव्हेंबर या काळात निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भाजप विधानसभेला 160 जागा लढणार असल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युतीत जितक्या जागा लढल्या, तितक्याच जागा लढण्याच्या मानसिकतेत पक्ष आहे. भाजप नेत्यांमध्ये 164 जागा लढण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली आहे. त्यानुसार कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन्ही पक्षांच्या वाट्याला मिळून 125 ते 130 जागा येण्याची शक्यता आहे. यात अन्य घटकपक्षांनाही सामावून घ्यावे लागणार आहेत. अजितदादा 70 जागांवर ठाम आहेत. तर एकनाथ शिंदेही 80 जागांच्या तयारीत आहेत. त्यामुळे जागावाटपावरुन ओढाताण होण्याची शक्यता आहे.

Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin Gadkari
MVA Politics Video : मुख्यमंत्रिपद उद्धव ठाकरेंकडेच? काँग्रेस-शरद पवार गटाला नवा प्रस्ताव

काही जागांची अदलाबदल होऊ शकते

जागावाटप करीत असताना महायुतीत 168 जागांवर कुठलाही वाद नसल्याचे बोलले जात होते. याचा अर्थ 120 जागांवर रस्सीखेच आहे. भाजप महायुतीत काही जागांची अदलाबदल करु शकतो. म्हणजेच मागच्या वेळी नसलेल्या जागा भाजपला मिळू शकतात, तर मागच्या वेळी लढलेल्या जागा मित्रपक्षांना सोडल्या जाऊ शकतात. उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता आणि पक्षाची मतदारसंघातील ताकद, या दोन निकषांच्या आधारे जागावाटप आणि उमेदवार निश्चिती केली जाणार आहे.

Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin Gadkari
Nitin Gadkari : भाजप '400 पार'च्या नाऱ्यावरून 240 वर कशी आली? नितीन गडकरींनी सांगितलं कारण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com