Raj Thackeray: अखेर राज ठाकरे मविआच्या नेत्यांसोबत आले एकत्र! मंत्रालयात पार पडली आगामी निवडणुकांबाबत खलबतं

Raj Thackeray with MVA :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत येण्यास इच्छुक असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहे.
MNS Raj Thackeray News
MNS Raj Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray with MVA : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत येण्यास इच्छुक असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहे. पण या आघाडीतल्या काँग्रेसनं मात्र त्यांना विरोध दर्शवला आहे. त्यामुळं मविआत मनसे हा नवा भिडू दाखल होणार की नाही याबाबत राज्यातील जनतेच्या मनात मोठी उत्सुकता आहे. पण जनतेच्या मनातला हा संभ्रम आज दूर झाल्याची परिस्थिती नक्कीच असू शकते. कारण राज ठाकरे यांनी मविआच्या प्रमुख नेत्यांसोबत आज मंत्रालयात एका बैठकीला हजेरी लावली.

महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या शिष्टमंडळानं आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची मंत्रालयातील कार्यालयात भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक याद्यांमधील घोळ तसंच मतदान प्रक्रीया पारदर्शकपणे पार पाडण्याची मागणी यावेळी या शिष्टमंडळानं त्यांच्याकडं केली. यावेळी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शेकापचे नेते जयंत पाटील, शिवसेना खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड तसंच महाविकास आघाडीतील सहयोगी पक्षांचे इतर नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

MNS Raj Thackeray News
Niphad politics : निफाडमध्ये आजी-माजी आमदारांना तिसऱ्या खेळाडूची धडक, तिहेरी लढत रंगणार

भेटीत काय घडलं?

दरम्यान, आगामी काळात निडवणुका या पारदर्शी पद्धतीनं झाल्या पाहिजेत, त्यासाठी आम्ही आज सत्ताधाऱ्यांना देखील निवडणूक अधिकाऱ्यांना भेटीसाठीचं निमंत्रण दिलं होतं. पण ते आलेले नाहीत त्यामुळं यामध्ये काहीतरी गडबड आहे हे निश्चित आहे. कुठेतरी धूर निघतोय ना? म्हणूनच लोक आरडाओरडा करत आहेत. त्यामुळं केवळ टीकेला टीका करुन चालणार नाही, निवडणूक प्रक्रियेतील आणि मतदार नोंदणी प्रक्रियेतील अनेक विषयांमध्ये त्रृटी आहेत. अनेक पक्ष याबाबत बोलत आहेत पण ज्यांना यामध्ये भाग घ्यायचा नाही त्यांना बहुदा अशाच प्रकारच्या निवडणुका हव्या आहेत. त्यामुळं आजच्या भेटीनंतर मुख्य निवडणूक अधिकारी काहीतरी योग्य तो निर्णय घेतील, अशी भूमिका मनसेचे नेते अविनास अभ्यंकर यांनी आजच्या भेटीबाबत मांडली.

MNS Raj Thackeray News
Cabinet Meeting Decision: महायुती सरकारचा दिवाळीपूर्वीच मोठा धमाका; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 'हे' तीन धडाकेबाज निर्णय

राज ठाकरेंच्या उपस्थितीची चर्चा

मविआच्या नेत्यांसोबत राज ठाकरेंची उपस्थिती असल्यानं मनसेही आता महाविकास आघाडीत सहभागी होणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. तत्पूर्वी शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र आलेले आहेत. पण अद्याप या दोन्ही पक्षांमध्ये अधिकृत युतीची घोषणा झालेली नाही. त्यामुळं कदाचित शिवसेनेसोबत जातानाच मविआत देखील सहभागी होण्याची घोषणा स्वतः राज ठाकरे लवकरच करण्याची शक्यता आहे. कारण दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून राज्यातील महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com