Shalarth ID Scam : वकिलांची फौज निष्प्रभ; जामीन नाकारल्याने 'त्या' भाजप नेत्याचा मुक्काम सेंट्रल जेल मध्येच!

BJP Leader’s Bail Plea Rejected in Shalarth Case : बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यातून 160 कोटींचा भ्रष्टाचार झाला. या गैरव्यवहारात बनावट संस्था उभ्या करण्यात आल्या. या बनावट संस्थांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे.
Sanjay Garud | Shalarth ID Scam
Sanjay Garud, Shalarth ID ScamSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sanjay Garuda News: बनावट शालार्थ आयडी आणि बोगस शिक्षण संस्थांच्या माध्यमातून झालेल्या तब्बल १६० कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यात विशेष तपास पथकानेचौकशीचा फास अधिक आवळला आहे. नाशिक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटीने आता धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील विविध शाळांचे रेकॉर्ड्स व शिक्षकांच्या नियुक्तीचे कागदपत्रे जप्त केली आहेत.

या प्रकरणात अटक करण्यात आलेले शेंदुर्णी (जामनेर) शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड व त्यांचे बंधू सहसचिव दीपक गरुड यांचा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम आणखी वाढला आहे. सुरुवातीला राजकीय व अन्य प्रभावाचा वापर करून संजय गरुड यांनी पोलीस कोठडीऐवजी रुग्णालयात मुक्काम ठोकला होता. मात्र, आता जामिनासाठी त्यांची धडपड सुरू आहे.

संजय गरुड यांनी वकिलांची मोठी फौज उभी करून न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु, "जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमधील गैरव्यवहाराचा तपास अद्याप सुरू असून, या टप्प्यावर जामीन दिल्यास तपासावर गंभीर परिणाम होईल," असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने जामिनावरील सुनावणी १२ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे.

Sanjay Garud | Shalarth ID Scam
Shalarth ID Scam : 160 कोटींच्या घोटाळ्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप नेत्याला जामीन मिळणार का? 3 ऑक्टोबरला सुनावणी

अटकपूर्व जामीन फेटाळला

याच प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी तथा शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण अद्याप फरार आहेत. नाशिक सत्र न्यायालयापाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यातून 160 कोटींचा भ्रष्टाचार झाला. या गैरव्यवहारात बनावट संस्था उभ्या करण्यात आल्या. या बनावट संस्थांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे.

Sanjay Garud | Shalarth ID Scam
Shalarth ID Scam : शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या घोटाळ्याच्या तपासासाठी आता दोन स्वतंत्र ACP ; 1200 संशयित रडारवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com