

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीच्या आमदार श्वेता महाले आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. दोघेही एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नसल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी शक्तीप्रदर्शन करत एकमेकांवर टीका केली असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आमदार श्वेता महाले यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे नाव न घेता टोला लगावला.
बुलढाणा जिल्ह्यातील परिस्थिती संदर्भात मदत व पुनर्वसन मंत्र्यासोबत चर्चा झाली. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघणार नाही. मात्र, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर होईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले असल्याचे आमदार श्वेता महाले यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.
बाप जर कुणी असेल तर सर्वसामान्य जनतेला मी बाप मानते. बाप काढणे आणि बोलणे हे संस्कार माझ्यावर झालेले नाहीत. वकिलांशी चर्चा करून कायदेशीर कारवाई करणार आहे. ज्यांच्यावर ते संस्कार झालेले असतील, त्याठिकाणी त्यांनी त्यांचा बाप दाखवावा, ती भाषा बोलावी. जनता खरा बाप असून विधानसभेत खरा बाप कोण आहे हे जनतेने दाखवून दिले. त्यांना 80 हजाराच्या मतांच्या आघाडीची अपेक्षा होती तेच 500-600 वर आले, असेही यावेळी श्वेता महाले म्हणाल्या.
मला जनतेने मतदारसंघाचा विकास करण्यासाठी खुर्चीवर बसवले आहे. विकासाचा मुद्दा सोडून मात्र दुसऱ्याच्या मतदारसंघांमध्ये ढवळाढवळ करणे योग्य नाही. महायुतीचा धर्म आपण पाळला पाहिजे, मात्र काही लोकांना दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन ढवळा ढवळ करण्याची सवय आहे, असा नाव न घेता महालेंनी संजय गायकवाड यांना टोला लगावला.
संजय गायकवाड यांनी महाले यांनी वाढदिवसाला कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप केला होता. यावरआम्ही कुणीच पैसे खर्च केले नाही. जे केले ते त्यांच्या मित्रानी खर्च केले. हुकूमशाही, दडपशाही बुलढाण्यात चालणार नाही. बुलढाणेकर अजिबात भीक घालत नाहीत, असे श्वेता महाले म्हणाल्या. बापासारखे शरीर कुठून आणणार? या गायकवाडांच्या वक्तव्यावर कायदेशीर मार्गाने जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. तुम्ही आमदार असलात तरी कुठल्याही महिलेच्या शरीराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, तसा कायदा नाही. याबाबतीत मी कायदेशीरमार्गाने जाणार, वकिलांचा सल्ला घेणार आहे, असे श्वेता महाले यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.