Ujjwal Nikam : 628 जन्मठेप, 37 जण फासावर...! निकम यांनी लढवलेल्या हायप्रोफाईल केस कोणत्या?

Beed News : अखेर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Ujjwal Nikam:
Ujjwal Nikam:Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : अखेर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती झाली आहे. याबाबतचे आदेश नुकतेच काढण्यात आले. या निर्णयामुळे मस्साजोगचे ग्रामस्थ, देशमुख कुटुंबिय आणि भाजप आमदार सुरेश धस यांची मागील अनेक दिवसांपासूनची मागणी मान्य झाली आहे.

उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. भाजप आमदार सुरेश धस यांनीही ही मागणी लावून धरली होती. याच मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे. पण निकम यांच्यासाठी सर्वच जण एवढे आग्रही का होते? निकम यांना आतापर्यंत कोणत्या हायप्रोफाईल केसेसचा अनुभव आहे? आतापर्यंत त्यांनी किती गुन्हेगारांना फासावल लटकवलं आहे? असा प्रश्न विचारला जात आहे.

उज्ज्वल निकम यांची कारकीर्द :

उज्ज्वल निकम यांचा जन्म 1953 साली जळगावमध्येच झाला. त्यांच्या कारकि‍र्दीची सुरुवातही जळगावमध्येच (Jalgaon) झाली. सुरुवातीला ते जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा वकील म्हणून काम करत होते. त्यांच्या बिनतोड युक्तीवादाने जळगाव आणि खान्देशात बरीच चर्चा झाली. अनेक खटल्यांचा त्यांनी यशस्वी शेवट करत पिडीतांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. याच काळात त्यांची राजकीय नेत्यांशीही उठ बस वाढली. निकम यांनी त्यानंतर अनेक राज्य पातळीवरील आणि राष्ट्रवी पातळीवरील खटले लढवले.

Ujjwal Nikam:
Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीना पळून जाण्यास कोणी मदत केली? सुरेश धसांनी उघड केले धाराशिव कनेक्शन

उज्ज्वल निकम यांनी आतापर्यंत लढवलेले काही प्रमुख खटले :

1991 सालचे कल्याण रेल्वे स्टेशनजवळील बॉम्बस्फोट प्रकरण, 1993 सालचे मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरण, 2003 सालचे गेट वे ऑफ इंडिया येथील बॉम्बस्फोट प्रकरण, 2008 मधील ताज आणि मुंबईतील इतर ठिकाणचा दहशतवादी हल्ला अशी प्रमुख दहशतवादी प्रकरणं निकम यांनी लढवली आहेत.

याशिवाय गुलशन कुमार हत्या, मरीन ड्राईव्ह बलात्कार, शक्तीमिल बलात्कार, प्रमोद महाजन हत्या , खैरलांजी हत्या, कोपर्डी बलात्कार, प्रीती राठी खून, मोहसीन शेख खून, पल्लवी पूरकायस्थ हत्या, पोलीस कर्मचारी सुनिल मोरे बलात्कार अशा विविध प्रकरणांमध्ये त्यांनी यशस्वीपणे विशेष सरकारी वकील म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

Ujjwal Nikam:
Santosh Deshmukh : हत्या, खंडणीखोरी अन् गुंडगिरी...; संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात पडसाद

628 जन्मठेप, 37 जण फासावर...!

आपल्या जवळपास 30 वर्षांच्या कारकि‍र्दीत उज्ज्वल निकम यांनी जवळपास 628 गुन्हेगारांना जन्मठेपेपर्यंत पोहचवले आहे. तर 37 गुन्हेगारांना फासावर लटकवले आहे. त्यांच्या या सगळ्या यशस्वी कारकीर्दीमुळे आणि विश्वसनीय प्रतिमेमुळे मस्साजोग ग्रामस्थांनी आणि देशमुख कुटुंबियांनी संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी निकम यांचीच नियुक्ती करावी अशी मागणी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com