

kolhapur News : पश्चिम महाराष्ट्र व्यवस्थापन समितीमध्ये कोट्यावधीचा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप क्षत्रिय मराठा रिसायत फाउंडेशनचे प्रसाद मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तत्कालीन देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि भाजप नेते महेश जाधव, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पत्नी तथा कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर यांच्यासह सचिव आणि व्यवस्थापकावरच भ्रष्ट्राचाराचे आरोप करण्यात आले आहेत. यामुळे आता लवकरच चौकशीचा फेरा सुरू होणार असून या आरोपांमुळे कोल्हापुरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
प्रसाद मोहिते यांनी, 2014 च्या युती सरकारच्या काळात करवीर निवासिनी आई अंबाबाईला अर्पण होणाऱ्या साड्या, बोगस पूरग्रस्त निधी, देवस्थान जमिनीच्या 8 हजार गटांचं सर्वेक्षण करण्यासाठी नियमबाह्य पद्धतीनं दिलेलं सात कोटींचं टेंडर, सामुदायिक विवाह सोहळा यात कोट्यावधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. तसेच हे आरोप करताना त्यांनी, तत्कालीन देवस्थान समितीचे अध्यक्षांसह कोषाध्यक्ष, सचिव आणि व्यवस्थापकावर आरोप केले आहेत.
राज्यात 2014 यावर्षी भाजप शिवसेनेचे सरकार आल्यानंतर 2017 मध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर अध्यक्ष म्हणून भाजपचे महेश जाधव, कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, सचिव विजय पवार व्यवस्थापक धनाजी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. 2017 ते 2021 या कालावधीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीत बेकायदेशीर नोकर भरती झाली. महापुर काळात जनावरांचे धान्य प्रोटीन्स खरेदीत घोटाळा झाला. बोगस पूरग्रस्त दाखवून निधी उचलल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
तसेच कागदपत्रे पुराव्यांशी प्रसाद मोहिते, सौरभ पवार यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे तक्रार दिली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष आणि कर्मचाऱ्यांनी विरोधात दोषारोप पत्र तयार करून हा अहवाल राज्याच्या विधी व न्याय विभागाला पाठवला होता. त्याची चौकशी लागणार आहे. जर न्याय नाही मिळाला तर न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिला आहे.
भाजपचे माजी प्रदेश सचिव महेश जाधव यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष म्हणून तर राज्य नियोजन मंडळाच्या अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पत्नी वैशाली क्षीरसागर यांनी कोषाध्यक्ष म्हणून कामं पाहिले आहे.
अशा कोणत्याही प्रकाराचा घोटाळा, गैरव्यवहार झालेला नाही. आरोप करणाऱ्या व्यक्तीला समितीमध्ये कोणतरी पद हवे असेल म्हणून प्रसिद्धीसाठी स्टंट करण्याचे काम सुरू आहे, अशी प्रतिक्रिया महेश जाधव यांनी सरकारनामाशी बोलताना दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.