Chandrakant Patil : झेडपी अध्यक्ष अन् महापालिकेत महापौर भाजपचाच; स्थानिकच्या निवडणुकांसाठी चंद्रकांत पाटलांनी सांगितली व्यूहरचना

BJP Mahayuti Strategy : भाजपची कार्यप्रणाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासक नेतृत्वावर विश्वास ठेवून या राज्यासाठी देण्यात आलेल्या अनेक महत्त्वाच्या योजना गोरगरिबांच्या कल्याणार्थ सरकार करत असलेले काम याचा सांगोपांग विचार करून हे सगळे काम जनतेपर्यंत कार्यकर्त्यांनी घेऊन जावं.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 07 Aug : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी पूर्वतयारी करत असून सर्वच निवडणुकांमध्ये भाजपचे सक्षम आणि ताकदीचे कार्यकर्ते आहेत.

पण राज्यात आणि केंद्रात महायुती म्हणून आपण काम करत असल्यामुळे महायुतीच्या माध्यमातूनच या निवडणुका लढवल्या जातील, असं स्पष्ट केलं आहे. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महापौर भाजपचे केले जातील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

भाजपच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयात भाजपच्या संघटनात्मक तीन जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या बैठका मंत्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील येणाऱ्या एकूण 68 जिल्हा परिषद गट व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत मधील राजकीय स्थिती काय आहे याचा अंदाज त्यांनी यावेळी घेतला.

Chandrakant Patil
Uddhav-Raj Thackeray Alliance : राज ठाकरेंसोबत युतीसाठी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार? दिल्लीत पाऊल टाकताच उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला

भाजपची कार्यप्रणाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासक नेतृत्वावर विश्वास ठेवून या राज्यासाठी देण्यात आलेल्या अनेक महत्त्वाच्या योजना गोरगरिबांच्या कल्याणार्थ सरकार करत असलेले काम याचा सांगोपांग विचार करून हे सगळे काम जनतेपर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेऊन जावं.

तसंच आगामी निवडणुकांसाठी समाजाच्या संपर्कात राहावे अशा सूचना चंद्रकांत पाटील कार्यकर्त्यांना दिल्या.मजबुत संघटनात्मक बांधणीच्या आधारेच भाजप नेहमीच जनतेपर्यंत पोहोचत असते अशा विकासाच्या अनेक माध्यमातून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क करावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

Chandrakant Patil
Narendra Modi : मला मोठी किंमत चुकवावी लागेल, पण मी तयार! पंतप्रधान मोदींचं मोठं विधान, 24 तासांत पलटवार

दरम्यान राज्यभरात घडलेल्या विविध घटना संदर्भात आणि कोल्हापुरातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी भाजप कार्यालयात मंत्री चंद्रकांत आल्याचे समजताच माध्यमांचा गराडा पडला. मात्र बैठक सुरू होण्यापूर्वी मंत्री पाटील यांची प्रतिक्रिया घ्यावी अशी विनंती त्यांच्याकडे करण्यात आली. मात्र पाटील यांनी लांबूनच हात जोडत माझं बरं चाललंय, अशी प्रतिक्रिया देत वेळ मारून नेली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com