BJP Politics : सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते होणार ZP अन् पंचायत समितीचे सदस्य; फडणवीस सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

BJP Politics : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा परिषदेत पाच व पंचायत समितीत दोन स्वीकृत सदस्य नेमण्याची मागणी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
Revenue Minister Chandrashekhar Bawankule writes to CM Devendra Fadnavis requesting approval for two nominated members in Panchayat Samiti and five in Zilla Parishad, receiving a positive reaction.
Revenue Minister Chandrashekhar Bawankule writes to CM Devendra Fadnavis requesting approval for two nominated members in Panchayat Samiti and five in Zilla Parishad, receiving a positive reaction.Sarkarnama
Published on
Updated on

ZP, Panchayat Samiti News : पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणारे, पक्षवाढीसाठी रात्र न् दिवस झटणारे पण तरीही कोणते राजकीय पद न मिळालेल्या कार्यकर्त्यांसाठी फडणवीस सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. महापालिका आणि नगरपालिकेप्रमाणेच आता जिल्हा परिषद 5 आणि पंचायत समितीवर 2 स्वीकृत सदस्यांची नेमणूक व्हावी अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती पत्र लिहिले असून मुख्यमंत्र्यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामविकास विभागाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बावनकुळे यांनी हे पत्र 'एक्स' वर पोस्ट केले आहे. या सुधारणेनंतर ग्रामविकासात्मक प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी समाजाभिमुख कार्यकर्त्याला मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रात काय मागणी आहे?

ग्रामीण स्तरावर सक्रिय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व आणि संधी मिळावी या दृष्टिकोनातून, विद्यमान महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. सदर अधिनियमातील तरतुदींनुसार स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करता येते. परंतु सध्याच्या धोरणानुसार ह्या संधी मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत.

त्यामुळे, राज्य शासनाने सदर अधिनियमानुसार सुधारणा करून जिल्हा परिषदेसाठी ०५ (पाच) व पंचायत समितीसाठी ०२ (दोन) स्वीकृत सदस्य नेमण्याची तरतूद करावी, अशी नम्र विनंती आहे.

यामुळे समाजाभिमुख कार्य करणाऱ्या, परंतु निवडणूक लढविण्याची क्षमता नसलेल्या पात्र कार्यकर्त्यांना विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होईल, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक प्रभावी व सर्वसमावेशक होईल.

Revenue Minister Chandrashekhar Bawankule writes to CM Devendra Fadnavis requesting approval for two nominated members in Panchayat Samiti and five in Zilla Parishad, receiving a positive reaction.
Pune ZP Reservation : वळसे पाटलांचे पुतणे, हर्षवर्धन पाटलांची कन्या पुन्हा दिसणार झेडपीत; बुट्टे पाटील, देवकाते, लांडेंना धक्का!

आपण याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्वाची संधी उपलब्ध करून देण्याकामी उपरोक्त सुधारणेबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात, ही विनंती, असे पत्र बावनकुळे यांनी लिहिले आहे.

या पत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे. तसेच ग्रामविकास विभागाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सुधारणेनंतर ग्रामविकासात्मक प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी समाजाभिमुख कार्यकर्त्याला मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com