NEET परीक्षेचा पुन्हा गोंधळ! फेरपरीक्षेचं प्रवेश पत्र डाऊनलोड करताना विद्यार्थ्यांना अडचण; काय आहे नवी अपडेट?

NEET Exam : नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानं ही परीक्षा सरकारनं रद्द केली होती, त्यानंतर आता येत्या २१ तारखेला पुन्हा ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी पुन्हा पेपरफुटीची घटना घडू नये म्हणून सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
NEET Exam
NEET Exam
Published on
Updated on

NEET Exam : नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानं ही परीक्षा सरकारनं रद्द केली होती, त्यानंतर आता येत्या २१ तारखेला पुन्हा ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी पुन्हा पेपरफुटीची घटना घडू नये म्हणून सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पण पुन्हा एकदा NTA नं गोंधळ वाढवला असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारी प्रवेश पत्र डाऊनलोड करताना विचारल्या जाणाऱ्या बँक डिटेल्समुळं होत आहे. ही नवी अपडेट नेमकी काय आहे? जाणून घेऊयात.

NEET Exam
Abhijeet Dipke Assaulted : CJPच्या अभिजीत दिपकेंना मारहाण! आंदोलनादरम्यान भाषण करत असताना झाला हल्ला

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (NTA) नीटच्या फेरपरीक्षेसाठी प्रवेश पत्र रविवार, १४ जून उपलब्ध करुन दिले आहेत. बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या तक्रारी या वेबसाईट क्रॅश झाल्याच्या किंवा ती हळूहळू काम करत असल्याच्या तक्रारी असतात. पण पण आता रिफंडवरुन नवा गोंधळ निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी असा दावा केला आहे की, जेव्हा उमेदवार NEETच्या फेरपरीक्षेचं प्रवेशपत्र (admit card) डाउनलोड करण्यासाठी लॉग-इन करतात, तेव्हा त्यांना 'NEET रिफंड' (परतावा) मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या बँक तपशीलांमध्ये बदल करण्याचा एक छोटासा पर्याय दिसतो.

मात्र, विद्यार्थ्यांचा असा आरोप आहे की, जर त्यांनी बँक तपशीलांमध्ये बदल न करता प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया पुढे चालू ठेवली, तर NTA कडून 'तुम्ही परताव्यासाठी तपशील न देण्याचे मान्य केले आहे,' असा संदेश दर्शविला जातो. या मेसेजमुळं आपल्याला रिफंड मिळणारच नाही असा समजही विद्यार्थ्यांमध्ये होत आहे.

NEET Exam
राम मंदिराचा वाद पुन्हा सुप्रीम कोर्टात! भाविकांच्या देणगीत केला घोटाळा

दरम्यान, यंदा ३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा पार पडली होती, पण हा पेपर फुटल्याचं काही दिवसांतच लक्षात आल्यानंतर ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय NTA कडून घेण्यात आला होता. त्यानंतर २१ जून २०२६ रोजी ही परीक्षा पुन्हा घेतली जाईल असं जाहीर करण्यात आलं. त्यानुसार, आता येत्या रविवारी, २१ जून रोजी ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. NTA कडून वर्षातून एकदाच ही परीक्षा घेतली जाते, ही परीक्षा केवळ वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची पात्रता आणि प्रवेश परीक्षा आहे.

NEET Exam
Iran-USA War: इराण-अमेरिका युद्ध थांबलं, लगेचच आली खूशखबर! जगभरातील नागरिकांना दिलासा, भारताला होणार मोठा फायदा

नीटची रिफंड पॉलिसी काय आहे?

यंदा नीटचा पेपर फुटल्यामुळं परीक्षाच रद्द केल्यानं या अर्जासाठी आकारण्यात आलेली फी विद्यार्थ्यांना पुन्हा देण्याचा (रिफंड) निर्णय शासनानं नुकताच घेतला आहे. पण नेहमीच्या परिस्थितीत NEET अर्जाची फी नॉनरिफंडेबल असते. उमेदवारानं स्वतःहून परीक्षा सोडली किंवा अर्ज सबमिट केला तर त्याचे पैसे त्याला पुन्हा मिळत नाहीत. यामध्ये फक्त NTA कडून काही कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली किंवा इतर काही तांत्रिक अडचण आली तरच फी परत दिली जाते. यामध्ये काऊन्सिलिंग रिफंड हा वेगळा असतो, यामध्ये सिक्युरिटी डिपॉझिट, रजिस्ट्रेशन फीचा रिफंड हा काऊन्सिलिंग नियमानुसार मिळतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com