Vinod Tawde : सीसीटीव्ही तपासा, आयोगाकडून चौकशी होऊ द्या; विनोद तावडेंनी दिले स्पष्टीकरण

Vinod Tawde demands CCTV review and inquiry: विरार पूर्व येथील मनवेलपाडातील विवांत हॉटलमध्ये भाजप-बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते समोरासमोर आले. भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे वसई येथील घटनेबाबत निवेदन केले आहे.
Vinod Tawade
Vinod Tawade Sarkarnama
Published on
Updated on

Virar News : विरार पूर्व येथील मनवेलपाडातील विवांत हॉटलमध्ये भाजप-बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते समोरासमोर आले. यावेळी भाजप व बविआच्या कार्यकर्त्याच्या दोन्ही गटात तुफान राडा झाला. या घटनेनंतर सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असले तरी या प्रकरणी भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

वाडा येथून मंगळवारी मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजप (Bjp) उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. यावेळी फक्त आमच्यात चर्चाच झाली. त्याबाबत खात्री करायची असेल तर हॉटेलचा सीसीटीव्ही तपासा अथवा निवडणूक आयोगकडून चौकशी करावी, असे आवाहन भाजपचे केंद्रीय मंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी केली.

Vinod Tawade
Vinod Tawde : विनोद तावडेंकडून पैशांचे वाटप? विरारमध्ये राडा, 'बविआ'कडून गंभीर आरोप

मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी बोलत होतो. त्यावेळी अचानक काही कार्यकर्ते आले व त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे करून आरडाओरडा सुरू केला. हे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे असल्याचे समजल्यानंतर मी त्या पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना फोन केला. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवरावे, अशी विनंती केली.

Vinod Tawade
Vinod Tawde : दोन डायऱ्या, 15 कोटींच्या वाटपाची नोंद अन् माफी; विनोद तावडे बसलेल्या हॉटेलमध्ये काय घडलं?

हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर तेथे आले. त्या दोघांशी बोलणे झाल्यावर त्यांच्यासोबत मी एकाच गाडीतून बाहेर पडलो. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला आहे. मी केवळ भाजप कार्यकर्त्यांसोबत चहापानासाठी गेलो होतो व चर्चा करत होतो. त्यावेळी माझ्याकडून पैसे वाटप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या संदर्भातील सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी, स्पष्ट होईल, असेही भाजप नेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

Vinod Tawade
Vinod Tawde : विनोद तावडेंकडून पैशांचे वाटप? विरारमध्ये राडा, 'बविआ'कडून गंभीर आरोप

राहुल गांधी, सुप्रिया सुळे अशा यासंदर्भात टीका करणाऱ्या नेत्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. तसेच याबाबतीत निवडणूक आयोगाकडून निःपक्ष चौकशी व्हावी, असेही तावडे म्हणाले.

Vinod Tawade
Sushma Andhare : 'भाजपच्या 'नोट जिहाद'ने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला'; सुषमा अंधारेंचे जिव्हारी लागणारे ट्विट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com