Chhagan Bhujbal News : ऐन निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ

Political News : सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता सर्वच पक्षाकडून निवडणुकीच्या तयारीला वेग आला असतानाच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता सर्वच पक्षाकडून निवडणुकीच्या तयारीला वेग आला असतानाच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह आणखी दोन जणांनी याबाबत एक याचिका दाखल केली आहे.

या घोटाळ्यात भुजबळ कुटुंबियांना मिळालेल्या दोषमुक्तीविरोधात दाखल आव्हान याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर मंत्री छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) अडचणीत येत्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे.

एसीबीच्या विशेष न्यायालयाने छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांना 9 सप्टेंबर 2021 रोजी दोषमुक्त केले होते. मात्र, त्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, दीपक देशपांडे यांच्यासह आमदार सुहास कांदे यांच्यातर्फे तीन स्वतंत्र याचिका दाखल करत आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे या याचिकांवर एप्रिलमध्ये न्यायालयाने भुजबळ कुटुंबियांना नोटीसा बजावल्या होत्या.

Chhagan Bhujbal
Sunil Kedar : नागपूर जिल्ह्यातील ठाकरे, पवारांचे उमेदवार सुनील केदार ठरवणार? स्थानिक नेते धास्तावले

अडचणी वाढण्याची शक्यता

त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी थंडावली होती. याच आव्हान याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी याचिकाकर्ते आग्रही आहेत. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकांमध्ये भुजबळांच्या मागे या प्रकरणी सुनावणी घेण्यात येणार असल्याने अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Chhagan Bhujbal
Kishor Jorgewar : आमदार किशोर जोरगेवार यांचा भाजप प्रवेश कोणी रोखला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com