Chhagan Bhujbal upset: मंत्री छगन भुजबळ नाराज; राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची देवगिरीवर तातडीने बोलावली बैठक

NCP senior leaders meeting News: नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक बोलावण्यात आली आहे.
Chagan Bhubal
Chagan Bhubalarkarnama
Published on
Updated on

Mumbai news : मराठा आरक्षण आंदोलनावेळी मनोज जरांगे यांना राज्य सरकरकडून हैदराबाद गॅझेटचा जीआर देण्यात आला. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला असून ते या बैठकीस हजर नव्हते. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक बोलावण्यात आली आहे.

या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीवर भुजबळ यांनी बहिष्कार टाकला होता ते या बैठकीस हजर नव्हते. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जात आहेत.

Chagan Bhubal
Abhijit Wanjarri Vs BJP : अभिजित वंजारी आमदार नेमके कुठल्या मतदारसंघाचे? काँग्रेस-भाजपचा वाद पोलिस आयुक्तांपर्यंत पोहोचला

ओबीसींंमधून मराठा आरक्षण देऊ नये, याकरिता छगन भुजबळांचा (Chagan Bhujbal) सुरूवातीपासूनच विरोध होता. त्यामध्येच सरकारने ओबीसींसंदर्भात थेट जीआर काढला आहे. सरकारने दिलेल्या जीआरच्या विरोधात अनेकजण कोर्टात जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यावर जरांगे पाटील यांनी मोठे विधान करत म्हटले की, कोणी कितीही कोर्टात याचिका दाखल केल्या तरी काही फरक पडणार नाही. त्यामुळे आता भुजबळ काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Chagan Bhubal
Manoj Jarange Patil Agitation: मराठा आरक्षण आंदोलन; डॉ राधाकृष्ण विखे पाटील ठरले मुख्यमंत्र्यांचे नवे संकट मोचक!

मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बुधवारी बैठक बोलावण्यात आली आहे. त्या बैठीकीत भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी काय पावले उचलली जातात याकडे लक्ष लागले आहे.

Chagan Bhubal
Devendra Fadnavis On OBC : 'गैरसमज दूर झाला, आता उपोषणही मागे घ्यावं..', मुख्यमंत्र्यांचं ओबीसी समाजाला आवाहन

दरम्यान, राज्य सरकरकडून ओबीसी समाजाला दिलासा देण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारकडून ओबीसी समाजासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत सरकारमधील तीन मित्र पक्षाचे प्रत्येकी दोन मंत्री आणि दोन अधिकारी सदस्य असणार आहेत.

Chagan Bhubal
Babanrao Taywade Gr विरोधात न्यायालयात जाणार? , तायवाडे आक्रमक ।Manoj Jarange Patil News।

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com