Abhijit Wanjarri Vs BJP : अभिजित वंजारी आमदार नेमके कुठल्या मतदारसंघाचे? काँग्रेस-भाजपचा वाद पोलिस आयुक्तांपर्यंत पोहोचला

BJP Vs Congress : अभिजित वंजारी नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघातून निवडून आले आहेत. एकेकाळी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे करीत होते. त्यांच्या जागी भाजपने नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी दिली होता.
Abhijit Wanjarri Vs BJP  (1).jpg
Abhijit Wanjarri Vs BJP (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: विधान परिषद सदस्य ॲड. अभिजित वंजारी हे कुठल्या विधानसभा मतदार संघाचे आमदार यावरून काँग्रेस आणि भाजपात मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयासमोर असलेल्या फलकाला काळे फासले तर काँग्रेसने या विरोधात आंदोलन करून भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगलाच दम दिला. आता हा वाद पोलिस ठाण्यात पोहोचला आहे. काँग्रेसने (Congress) काळे फासल्याची तक्रार पोलिस आयुक्तांकडे केली आहे तर दुसरीकडे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते पोलिस आयुक्तांकडे जाणार आहेत.

अभिजित वंजारी नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघातून निवडून आले आहेत. एकेकाळी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे करीत होते. त्यांच्या जागी भाजपने नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी दिली होता.

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या या निवडणुकीत वंजारी यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. अभिजित वंजारी विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांचे एक कार्यालय पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यांच्या कार्यालयासमोर अभिजित वंजारी, आमदार, पूर्व नागपूर असा फलक लावण्यात आला आहे.

पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे आहेत. ते भाजपचे (BJP) आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा या फलकावर आक्षेप होता. दोन दिवसांपूर्वी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या फलकाला काळे फासून आपला राग व्यक्त केला. आमदार अभिजित वंजारी यापूर्वी पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून कृष्णा खोपडे यांच्या विरोधात निवडणूक लढली आहे.

Abhijit Wanjarri Vs BJP  (1).jpg
NCP Sharad Pawar Politics: गणपती हिंदू-मुस्लीम ऐक्याचा...डॉ. झाकीर शेख यांच्या गणपतीच्या आरतीला क्रीडामंत्री कोकाटेंसह नेत्यांनी केली गर्दी!

2024 च्या निवडणुकीत मात्र हा मतदारसंघ शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्यात आला होता. असे असले तरी अभिजित वंजारी यांनी आपाला पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघावरचा दावा कायम ठेवला आहे. 2014 च्या निवडणूक अभिजित वंजारी यांनी लढली होती. त्यांनी सुमारे 50 हजार मते घेतली होती.

त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस पुरुषोत्तम हजारे यांना उमेदवारी दिली होती. मात्र दहा वर्षांपासून अभिजित वंजारी यांनी पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात कार्यालय आहे. त्यांनी आपल्या आमदार फंडातून पूर्व नागपूरमध्ये काही विकासाची कामे हाती घेतली होती. यावरूनसुद्धा भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता.

Abhijit Wanjarri Vs BJP  (1).jpg
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या लढ्याला मोठं यश, अखेर सरकार झुकलं; हैदराबाद गॅझेटसह 'या' मोठ्या मागण्या मान्य

अभिजित वंजारी यांच्या फलकाला काळे फासल्यानंतर सोमवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावरून काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच वाद झाला होता. दोन्ही गट एकमेकांसमोर आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. वंजारी यांच्या कार्यालयाच्या समोर असलेल्या फलकाला काळे फासणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी सज्जड दम दिला. तुम्ही सत्ताधारी आहात म्हणून काहीही खपवून घेतले जाणार नाही. आम्ही रस्त्यावरचे लोक आहोत.

सध्या गणेशोत्सव सुरू आहे. लोकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही शांत बसलो आहोत. अन्यथा जशास तसे उत्तर दिले असते असे सांगून ठाकरे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना खबरदारीचा इशारा दिला.विकास ठाकरे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगलेच ठणकावले. तुम्ही सत्ताधारी आहात.

Abhijit Wanjarri Vs BJP  (1).jpg
Manoj Jarange Patil Agitation: सकल मराठा समाजाचे थेट राज्यपालांना साकडे; मराठा आंदोलन बदनाम करण्याच्या कारस्थानाची चौकशी करा!

सध्या सणासुदीचे दिवस आहेत. शहराची शांतता भंग होऊ नये याची काळजी सत्ताधाऱ्यांना प्रामुख्याने घ्यावी लागते. मात्र तुम्‍हीच असे वागत असाल तर आम्हालाही जशाच तसे उत्तर द्यावे लागेल. याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जाईल. पोलिस आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. आम्ही रस्त्यावरचे लोक आहोत. जशास तसे उत्तर देण्याची आम्ही तयारी आहे.

मात्र, गणेशोत्सवात वाद वाढू नये आणि त्याचा लोकांना त्रास होऊ नये याकरिता आम्ही संयम बाळगून आहोत, अशा शब्दात ठाकरे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सुनावले. आता आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते पोलिस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com