Raigadwadi News: इस्लामपूरचे ईश्वरपूर नामांतरानंतर महायुतीने आणखी एक मोठा निर्णय घेत रायगड किल्ल्याच्या पायथ्याशीच असलेल्या निजापूरचे नामांतर केले आहे. सरकारने रायगड जिल्ह्यातील छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचे नाव बदलण्याची घोषणा मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत केली. 'किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत' असे या ग्रामपंचायतीचे नामांतर करण्यात आले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी छत्र निजामपूरचे नामांतर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते.
छत्री निजापूर ऐवजी रायगडवाडी म्हणून नाव देण्यात आले आहे. ग्रामस्थांनी त्यांच्या गावाचे नामांतर करावे म्हणून मागणी केली होती. विशेष ग्रामसभा घेत तसा प्रस्ताव सरकारला दिला होता. याविषयी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार राहूल कुल यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.
अखेर ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत निजापूरचे नामांतर रायगडवाडी करण्यात आले आहे. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या या ग्रामपंचायतीच्या नामांतरची मागणी गेली अनेक वर्ष येथील ग्रामस्थ करत होते. त्यासाठी पाठपूरावा करत होते. त्यांच्या मागणीला यश आले असून निजामपूरचे नाव आता रायगडवाडी असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावाचे नाव निजापूर असणे हे परकीय सत्तेच्या खूणा असल्याचे मानले जात होते. त्यामुळे गावाचे नाव बदलण्यासाठी गावकरी ठाम होते. गोपीचंद पडळकर यांनी हा मुद्दा वारंवार उपस्थित केला. तर, मंत्री भरत गोगावले यांनी देखील निजापूरचे नामांतर झाले पाहिजे अशी भूमिका घेतली होती. याबाबत निजापूर ग्रामपंचायतीने ठराव करत नामांतराच्या मागणीला पाठींबा दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.