Prakash Mahajan: "राज ठाकरे का सिपाही हूं, कहां आऊं?"; प्रकाश महाजनांचं निशिकांत दुबेंना प्रतिआव्हान

Prakash Mahajan Challenge to Nishikant Dubey: मीरा रोड इथं राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेनंतर पुन्हा एकदा मराठी अस्तिमेचा मुद्दा उफाळून आला आहे.
Prakash Mahajan
Prakash Mahajan
Published on
Updated on

Prakash Mahajan Challenge to Nishikant Dubey: मीरा रोड इथं राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेनंतर पुन्हा एकदा मराठी अस्तिमेचा मुद्दा उफाळून आला आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काल एएनआयच्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा मराठी माणसाबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. यानंतर महाराष्ट्रात पुन्हा संतापाची लाट पसरली आहे. यापार्श्वभूमीवर आता मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी थेट खासदार दुबेंना प्रतिआव्हान दिलं आहे.

Prakash Mahajan
NCP News : एका आठवड्यात राजीनामा द्या; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यासह दोन आमदारांना आदेश

तुम्हीच दिवस, वेळ आणि ठिकाण ठरवा मी राज ठाकरेंचा शिपाई आहे, कुठं येऊ सांगा? अशा शब्दांत प्रकाश महाजन यांनी खासदार निशिकांत दुबे यांना प्रतिआव्हान दिलं आहे. त्याचबरोबर महाजन यांनी अभिनेता आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांनी केलेल्या टीकेवरुन त्यांचाही समाचार घेतला आहे. त्यामुळं हे मराठी विरुद्ध हिंदीचं राजकारण आता तुर्तास तरी थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. महापालिकाच्या निवडणुकांचा काळ जसजसा जवळ येत जाईल तसा हा संघर्ष वाढतच जाणार आहे.

Prakash Mahajan
BJP Politics : ज्यांनी गद्दारी केली त्यांनाच 'रेड कार्पेट', जळगाव भाजपमध्ये नाराजीचं वादळ

प्रकाश महाजन नेमकं काय म्हणाले?

प्रकाश महाजन यांनी सोशल मीडियावर आमचा एक फोटो पोस्ट करत त्याला कॅप्शन देत त्यातून खासदार निशिकांत दुबे यांना प्रतिआव्हान दिलं आहे. "दिन तुम्हारा, मैदान तुम्हारा और वक्त भी तुम्हारा, निशिकांत दुबेजी मैं राज ठाकरे का शिपाई हूं, कहां पर आंऊ" असं लिहित त्यांनी दुबेंना डिवचलं आहे. तसंच पुढे माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं की, "राज ठाकरे आमचे सेनापती आहेत, मी त्यांच्या एक पाऊल पुढे जातो. दिन तुम्हारा बताव कहाँ आऊ, हवं असल्यास झारखंडलाही येतो. मराठी लोक कुठे गेले नाहीत? अफगाणही आम्हाला भीत होतं. पण हा शहाणा सांगतो, राज ठाकरेंना मी हिंदी शिकवतो. अरे राज ठाकरेच्या बापानं मोहम्मद रफीकडून मराठी गाणे गाऊन घेतलं. आमच्याकडं कावळा ही मराठीत बोलतो. माझं नशीब आहे की प्रत्येक भाजपा खासदाराला मला आव्हान द्यावं लागतं आहे. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या या विधानांवर काहीही बोलत नाहीत त्यांना समज देत नाहीत"

Prakash Mahajan
NCP Politics : काका-पुतण्यांना एकत्र येण्यापूर्वी 'भाजपला' विचारात घ्यावं लागेल : राष्ट्रवादी विलीनीकरणावर तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं!

मनोज तिवारीची राज ठाकरेंवर टीका

दरम्यान, भाजप खासदार मनोज तिवारी यानं देखील या मराठी-हिंदी वादावर प्रतिक्रिया दिली आहे. या देशाची आणि महाराष्ट्राची प्रांतीय-भाषिक एकता आहे. हा भाईचारा तोडण्याचा प्रयत्न करणारा हा प्राणी आहे. त्यामुळं राज ठाकरेला जे बोलायचं आहे ते त्यानं बोलावं. पण कायम एक गोष्ट लक्षात ठेवा जो व्यक्ती राजकारणाच्या कचराकुंडीत गेला आहे, त्याला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी मी प्रार्थना करतो. यांना महाराष्ट्राची जनता कुठेही उभं करत नाही, आणि जो राज ठाकरेंसोबत जाईल तो देखील महाराष्ट्रात समाप्त होईल. कारण महाराष्ट्र, महाराष्ट्रातील लोक, मराठी भाषेच्या अस्मितेचं पालन भाजप योग्य रितीनं करत आहे. भाजप इतकं मराठी संस्कृतीचा आदर इतर कोणीही करु शकत नाही. पण हे लोक तर मराठी संस्कृतीचा अनादर करत आहेत"

Prakash Mahajan
Yogesh Kadam News : सावली बारच्या 'छमछम'ने शिवसेनेच्या मंत्र्यांची झोप उडवली; योगेश कदम अडचणीत!

महाजनांनी तिवारींना सुनावलं

मनोज तिवारींच्या या टीकेलाही प्रकाश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोण हा मनोज तिवारी? तो नाच्या तू लाव तुझा सिनेमा मुंबईत दाखवतो तुला. भाजपनं हे असले लोक आमच्यावर सोडू नये. यांना हिंदूमध्ये फूट पडायची आहे, अशा शब्दांत महाजन यांनी आपली भूमिका मांडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com