Imtiaz Jaleel News: वंचितच्या नगरसेवकानं इम्तियाज यांच्यावर ठोकला 1 कोटींचा दावा! अब्रूनुकसानीची नोटीस

Chhatrapati Sambhajinagar municipal scam: छत्रपती संभाजीनगर महापालिका घोटाळा प्रकरणात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना वंचित बहुजन आघाडी कडून अब्रूनुकसानीची नोटीस देण्यात आली आहे.
Imtiaz Jaleel allegation in Ramai Awas scheme
Imtiaz Jaleel allegation in Ramai Awas schemeSarkarnama
Published on
Updated on

Imtiaz Jalil notice news: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या रमाई आवास योजना अंतर्गत कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला होता. हा आरोप करताना त्यांनी सत्ताधारी भाजपसह वंचित बहुजन आघाडी व इतर पक्षांच्या काही नगरसेवकांची नावे घेतली होती.

यात प्रामुख्याने भाजपचे जालिंदर शेंडगे, वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अमित भुईगळ, माजी नगरसेविकेचे पती महेंद्र सोनवणे यांचा समावेश होता. खोटी कागदपत्र तयार करून या सर्वांनी गोरगरीब दलित समाजातील रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या नावावर प्रत्येकी अडीच लाख रुपयांचे अनुदान उचलून मोठा घोटाळा केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला होता.

Imtiaz Jaleel allegation in Ramai Awas scheme
Maval APMC Election: राष्ट्रवादीला धक्का!बहुमत असूनही मते फुटली; मावळ बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे सुभाष जाधव

मतदान न केल्याचा राग

यावर वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अमित भुईगळ यांनी आज आपल्या वकिलामार्फत इम्तियाज जलील यांना अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा देत एक कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. इम्तियाज जलील यांनी रमाई आवास योजनेच्या माध्यमातून माझ्यासह काही नगरसेवकांवर सूडबुद्धीने आरोप केले आहेत. लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दलित समाजाने इम्तियाज जलील यांना मतदान न केल्याचा राग ते अशा पद्धतीने काढत आहेत.

Imtiaz Jaleel allegation in Ramai Awas scheme
Income Tax New Rules: पगारदारांसाठी महत्वाची बातमी! 1 एप्रिलपासून 'फॉर्म 16' बंद, 'फॉर्म 130'ची एन्ट्री, टॅक्सचा हिशेब पूर्णपणे बदलणार

मोर्चामध्ये सहभागी

मी गोरगरीब लोकांची कामे करतो म्हणून मला मतदारांनी दुसऱ्यांदा निवडून दिले. मात्र सातत्याने वंचित व मागासवर्गीय समाजाला टारगेट करण्याचा प्रयत्न इम्तियाज जलील यांच्याकडून सातत्याने सुरू आहे. त्यांच्या विरोधात आंबेडकरी जनतेने काढलेल्या मोर्चामध्ये मी सहभागी झाल्याचा रागही त्यांना आहे. तो त्यांनी बोलूनही दाखवला आहे.

Imtiaz Jaleel allegation in Ramai Awas scheme
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणी पहिली मोठी प्रशासकीय कारवाई! अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दणका; अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

अतुल सावे यांच्या आदेशावरून?

रमाई आवास योजनेत कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नसून इम्तियाज जलील हे आम्हाला विनाकारण लक्ष करत आहेत. त्यामुळे मी वकिलांमार्फत त्यांना अब्रू नुकसानीचा दावा ठोकत एक कोटी रुपयांची नोटीस पाठवली असल्याचे अमित भुईगळ यांनी सांगितले. दरम्यान इम्तियाज जलील यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या आदेशावरून रमाई आवास योजना घोटाळा केल्याचा आरोप केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com