Rohit Pawar : फक्त निवडणूक वेळेवर होऊ द्या, तुम्हाला पराभवाचा पिक्चर दाखवणार...

Rohit Pawar On Jammu and Kashmir and Haryana Exit Polls : "भाजपच्या शेतकरीविरोधी, युवांविरोधी, संविधानविरोधी धोरणांमुळे देशभरात भाजपविरोधी लाट तयार झाली असून हरियाणा आणि जम्मू-कश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत INDIA आघाडी मोठ्या फरकाने भाजपचा पराभव करत असल्याचे स्पष्ट आहे."
Rohit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Rohit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 06 Oct : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा (Haryana) विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. हरियाणात तिसऱ्यांदा सत्ता मिळविण्यासाठी भाजपची धडपड सुरू असताना, या ठिकाणी भाजपला सत्ता गमवावी लागण्याची शक्यता आहे.

तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्रित सत्तेत येताना दिसत आहेत. हरियाणामध्ये काँग्रेसला मोठा विजय अपेक्षित आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडी पुढे दिसत आहे.

या एक्झिट पोलमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांचा कॉन्फिडन्स वाढल्याचं पाहायला मिळत आहे. निकालाचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट भाजपला आव्हान दिलं आहे.

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या विधानसभेच्या 90-90 जागांवर मतदान पूर्ण झाले आहे. 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. दोन्ही राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी 46 जागांची आवश्यकता आहे. अशातच जाहीर झालेल्या एक्झिट पोल मध्ये दोन्ही ठिकाणी इंडिया आघाडीची सरशी होताना दिसत आहे. तर भाजप कुठेतरी पिछाडी वर पडताना दिसत आहे.

Rohit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Aditya Thackeray : "लाडकी बहीण योजनेचे पोस्टर बघितलं तरी इगो दुखावतोय..." आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला

या एक्झिट पोलच्या अंदाजामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांचा कॉन्फिडन्स वाढला असून आगामी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका देखील यापेक्षा मोठा विजय साकार करू असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट केली आहे.

रोहित पवार म्हणतात, "भाजपच्या शेतकरीविरोधी, युवांविरोधी, संविधानविरोधी धोरणांमुळे देशभरात भाजपविरोधी लाट तयार झाली असून हरियाणा आणि जम्मू-कश्मिरच्या विधानसभा निवडणुकीत INDIA आघाडी मोठ्या फरकाने भाजपचा पराभव करत असल्याचे स्पष्ट आहे.

Rohit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Ashok Chavan News : एका पराभवाने वासे फिरले, अशोक चव्हाणांना मोदींची भेट, पण चिखलीकरांना प्रवेश नाही

हरियाणा, जम्मू-कश्मीरचा निकाल तर केवळ ट्रेलर असतील, भाजपला पराभवाचा खरा पिक्चर तर महाराष्ट्र दाखवणार आहे. कदाचित हाच अंदाज आल्याने ‘महाराष्ट्राचा निकाल हा देशाला दिशा देणारा ठरेल' असे भाजपचे वरिष्ठ नेतृत्व म्हणत असावेत.

या बदलाची सुरुवात हरियाणा आणि जम्मू कश्मीरच्या निकालाने होणार असली तरी राहिलेली कसर महाराष्ट्रच पूर्ण करेल. गुजरात स्टाईलने खूप काही करण्याचे प्रयत्न होतीलही परंतु हे आक्रमण परतून लावण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे. असो, फक्त निवडणूक वेळेवर व्हावी ही अपेक्षा!"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com