Mahayuti Government: 'नंदनवन', 'सागर', 'देवगिरी' अन् 'वर्षा' या सरकारी बंगल्यांवरचा 'पाहुणचार'; ठाकरेंच्या नेत्यानं खर्चाचा चक्रावणारा आकडाच सांगितला

Maharashtra News: मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी 2024-25 आणि 2025-26 या आर्थिक वर्षात खानपान सेवेवरील चक्रावणारी आकडेवारी सामान्य प्रशासन विभागाकडून माहिती अधिकारात समोर आली आहे.
Devendra Fadnavis, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी माहिती अधिकारातून (RTI) मिळालेल्या माहितीचा संदर्भ देत जनतेच्या पैशानं सरकारी खानावळी उघडल्या का असा संतप्त सवाल केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या वर्षा, सागर,नंदनवन, देवगिरी या सरकारी निवासस्थानांवर अडीच वर्षांत 'पाहुणचारा'चा खर्च काही तब्बल 21 कोटींवर पोहोचल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी 2024-25 आणि 2025-26 या आर्थिक वर्षात खानपान सेवेवरील चक्रावणारी आकडेवारी सामान्य प्रशासन विभागाकडून माहिती अधिकारात समोर आली आहे. याचाच आधार घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईनंतर नागपूर येथील निवासस्थानी तसेच दिल्लीतील महाराष्ट्र सदनात चहापान,अल्पोपाहारावरही लाखो रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे राऊतांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला धारेवर धरल्याचं चिन्हे आहेत.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सरकारी जनतेच्या पैशातून सरकारने खानावळी उघडल्या का असा सवाल देताना माहिती अधिकाराचा (RTI) संदर्भ दिला होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अधिकृत बंगल्यांवर झालेल्या जेवणाच्या खर्चावरूनच अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

Devendra Fadnavis, Eknath Shinde
West Bengal News: अमित शहांच्या कार्यक्रम आणि बैठकांपासून मुस्लिम IAS आणि IPS अधिकाऱ्यांना दूर ठेवलं..? महिला खासदाराच्या आरोपांनी उडवली खळबळ

खासदार संजय राऊतांनी "CM-DCMच्या बंगल्यावर 21 कोटींच्या जेवणावळी," असा उल्लेख करत काही गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रात शेतकरी, तरुण आणि सर्वसामान्य नागरिक विविध समस्यांशी संघर्ष करत असताना, सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या पैशांतून स्वतःसाठी 'सरकारी खानावळी' उघडल्या आहेत का, असा खडा सवालही विचारला आहे.

त्यांनी एकीकडे राज्य सरकारकडे विविध योजनांसाठी निधी नसल्याचं मुद्दा उपस्थित केला जातो. तर दुसऱ्या बाजूला सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' आणि उपमुख्यमंत्र्यांच्या 'देवगिरी' व 'सागर' तसेच नंदनवन या शासकीय बंगल्यांवर अतिथींच्या खाण्यापिण्यावर एवढी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी कशी केली जाते, अशी विचारणाही त्यांनी केली. तर नागपूर

Devendra Fadnavis, Eknath Shinde
Ramesh Mhatre: "...जामिनाच्याही लायक नाहीत"; डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टानं झाप झाप झापलं!

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या उपमुख्यमंत्री असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी राहत होते. डिसेंबर 2023 ते नोव्हेंबर 2024 या 11 महिन्यांच्या कालावधीत ‘सागर’वर पाहुण्यांच्या आदरातिथ्यावर 2 कोटी 28 लाख रुपयांहून अधिक खर्च झाल्याचं उपलब्ध कागदपत्रांतून समोर आलं होतं. एकनाथ शिंदे यांनी 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शासकीय निवासस्थान 'वर्षा' बंगल्यावर आणि 5 डिसेंबर 2024 रोजी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर 'नंदनवन' बंगल्यावर मिळून अडीच वर्षात 12 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला. शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात 'वर्षा' बंगल्यावर शासकीय खानपानापोटी सरकारने 5 कोटी 66 लाख 42 हजार रुपयांची देयके अदा केली होती.

तर दिवंगत अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी जुलै 2023 ते डिसेंबर 2024 यादरम्यान खानपानावर 1 कोटी 68 लाख तर जानेवारी 2025 ते जुलै 2025 या कालावधीत 75 लाख 40 हजार रुपये इतका खर्च झाला आहे. त्यामुळे ‘अतिथी तुम कितना खाओगे’ असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com