CJP strategy meeting : केंद्र सरकारची धाकधूक वाढली! CJP च्या कोअर कमिटीची बैठक फिक्स; तारीख अन् ठिकाणही आले समोर

Abhijit Dipke Calls Key CJP Meeting News : कॉकरोच जनता पार्टीला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यातच आता येत्या काळात पक्षाचा पुढील अजेंडा ठरविण्यासाठी CJP च्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे.
Cockroach Janata Party | Abhijeet Dipke
Abhijeet Dipke rejects Sanjay Raut's claim of a secret Narendra Modi meeting in the US, calling the alleged photo AI-generated.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दिल्लीतील जंतर मंतर मैदानावरील आंदोलनाने कॉकरोच जनता पार्टीने केंद्र सरकारला जागे केले. नीट परीक्षेतील घोळामुळे हे आंदोलन करण्यात आले. महिनाभरपेक्षा अधिककाळ हे आंदोलन सुरु होते. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. त्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. कॉकरोच जनता पार्टीला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यातच आता येत्या काळात पक्षाचा पुढील अजेंडा ठरविण्यासाठी CJP च्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीची तारीख अन् ठिकाणही ठरले असल्याने आता केंद्र सरकारची धाकधूक वाढली आहे.

दिल्लीतील जंतर मंतर मैदानावरील आंदोलनानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके छत्रपती संभाजीनगर येथील घरी आले आहेत. त्यांना भेटण्यासाठी नेतेमंडळी व नातेवाईक गर्दी करीत आहेत. त्यातच आता दुसरीकडे वेगवान घडामोडी घडत आहेत. आगामी काळातील पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी बुधवारी (5 ऑगस्टला) कॉकरोच जनता पार्टीच्या कोअर कमिटीची छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागून राहिले आहे.

या सीजेपीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला देशातील 15 ते 20 प्रमुख सदस्य उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत अभिजित दिपके चर्चा करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील दिपकेंच्या घरात ही बैठक होणार आहे. प्रमुख सदस्यांना तसा मेसेजही पाठवण्यात आला आहे. CJP चे पुढील ध्येय धोरण, भूमिका ठरवण्यासाठी ही बैठक होणार आहे. त्यामध्ये विविध मुद्दयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

Cockroach Janata Party | Abhijeet Dipke
Maharashtra News Live : मुंबईसह राज्यातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; आदित्य ठाकरेंचे पोलीस महासंचालकांना पत्र

बुधवारी ही महत्वाची बैठक होणार आहे. ही बैठक अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे. या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलकांची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

Cockroach Janata Party | Abhijeet Dipke
Maharashtra Live Politics Update : 'सरकारच्या हातात बंदुका- लाठी असेल, पण आमच्या हातात तिरंगा...'; उद्धव ठाकरे

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीला विदेशातून मिळणाऱ्या पैशांसंदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित केली जात आहेत. त्यामध्येच अभिजीत दिपकेंचे वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर अभिजीत यांना विदेशात पाठवण्यासाठी पैसा कुठून आला आणि याची चाैकशी केली जावी, अशी थेट मागणी करण्यात आली. हेच नाही तर अभिजीत दिपके यांचे वडील भगवानराव दिपके यांच्या आर्थिकबाबींचे चाैकशी करण्याची मागणी करण्यात आली असून तसे पत्रही देण्यात आले आहे. या मुद्द्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com