Devendra Fadnavis Vs Ajit Pawar : संग्राम थोपट्यांना पैसे देण्यास अजितदादांचा नकार? फडणवीसांनी थेट मुद्द्यालाच हात घातला अन्...

Sugar Factory Loan Case Sangram Thopte : संग्राम थोपटे यांच्या कारखान्याला कर्ज हामी देण्यावरून अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मतभेद समोर आले आहेत.
Devendra Fadnavis Ajit Pawar Sangram Thopte
Devendra Fadnavis Ajit Pawar Sangram Thopte sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यामध्ये सध्या जिथे मित्र पक्षाचा आमदार तिथे भाजप शोधतोय उमेदवार असंच रणनीतीक चित्र पाहायला मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचे आमदार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा पराभव केला. त्यानंतर काँग्रेसचे निष्ठावंत असलेले संग्राम थोपटे आता भाजपवासी झाले आहेत. भाजपवासी झालेल्या या संग्राम थोपटेंना सरकारने एक मोठं गिफ्ट दिला आहे. मात्र हे गिफ्ट देण्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमने-सामने आल्याचे सांगितलं जात आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील थोपटे विरुद्ध पवार हा संघर्ष फार जुना आहे. माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखला जाते. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि सुप्रिया सुळे यांना मदत करावी यासाठी शरद पवार यांनी आपल्या पारंपारिक विरोधकाची भेट घेतली. त्यानंतर अनंतराव थोपटे यांचे पुत्र असलेले संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार केला आणि मोठं बहुमत भोर-मुळशी-विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना मिळालं.

या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात होत्या त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या विरोधात संग्राम थोपटे यांनी प्रचार केला.त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी सरप्राईज उमेदवार देत शंकर मांडेकर यांना विजयापर्यंत पोहोचवलं. त्यानंतर मांडेकर यांना अजित पवारांनी आधीची रसद देत मतदारसंघामध्ये ताकद वाढवण्यासाठी पाठबळ दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसची मतदार संघातील वाढती ताकद पाहूनच आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टिकोनातून संग्राम थोपटे यांनी भाजप प्रवेश केला. कारखाना वाचविण्यासाठी थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचा देखील बोललं जातं.

Devendra Fadnavis Ajit Pawar Sangram Thopte
Aditi Tatkare : राजकारणापेक्षा वेगळी भूमिका; लाडक्या बाप्पासाठी मंत्री अदिती तटकरे रमल्या स्वयंपाकघरात, बनवला खास नैवेद्य!

संग्राम थोपटे काँग्रेसमध्ये असताना राजगड कारखान्यासाठी मंजूर करण्यात आलेले 80 कोटीच्या कर्जाला देखील स्थगिती देण्यात आली होती. आणि या स्थगिती देण्यामागे देखील अजितदादाच होते असं देखील बोललं जातं. त्यानंतर आता या साखर कारखान्यासाठी ४६७ कोटी रुपयांच्या कर्जाला हमी देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतला.

हा निर्णय घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार 'बंद पडलेल्या कारखान्याला कर्जाची हमी का द्यायची,' असा सवाल उपस्थित करत या निर्णयाबाबत आपली नाराजी दर्शवली. त्यामुळे पुन्हा एकदा राजगडला मिळणाऱ्या कर्ज हमीला स्थगिती मिळणार असं वाटत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच्या दिलेल्या कर्ज हमी बाबतचे दाखले देत यापूर्वी अशा प्रकारची हमी इतर कारखान्यांना दिल्याचे सांगत आपली भूमिका मांडली. त्यानंतर त्या कर्ज हमीला मंजुरी देण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे.

या कर्ज हमीला मंजुरी मिळाली असली तरी यामधून संग्राम थोपटे विरुद्ध अजित पवार यांच्या संघर्षाचा एक नवीन अंक पाहायला मिळाला. तसंच थोपटे यांच्या मुद्द्यावरून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस देखील आमने-सामने आले असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष किती गडद होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Devendra Fadnavis Ajit Pawar Sangram Thopte
Vishal Patil : मतचोरीवरून राजकारण तापलं! जयंत पाटील vs गोपीचंद पडळकर युद्धात आता विशाल पाटीलची एन्ट्री

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com