Fadnavis Vs Thackeray : राज ठाकरेंच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची जिव्हारी लागणारी टीका, CM फडणवीसांनी एकच शब्दा वापरला अन्...

Devendra Fadnavis Uddhav Thackeray :काहीही झालं तरी मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात घेणारच आहोत. मराठी माणसाच्या ताब्यात मुंबई गेली तर मालकाचं कसं होणार, अशी टीका फडणवीस, शहांवर उद्धव ठाकरेंनी केली.
Devendra Fadnavis uddhav Thackeray Raj Thackeray
Devendra Fadnavis uddhav Thackeray Raj Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis Politics : शिवसेनेच्या वर्धापन दिना निमित्त मुंबईत उद्धव ठाकरेंची सभा झाली. या सभेत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. या टीके दरम्यान त्यांनी आपला पक्ष आणि मनसेच्या युतीबाबत बोलताना राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्या हाॅटेलमध्ये झालेल्या भेटीवरून फडणवीसांना टार्गेट केले. ते म्हणाले, मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर गाठीभेटी घेऊ लागले.

या टीकेला फडणवीस काय प्रत्युत्तर देणार याची उत्सुकता होती. ते आज (शुक्रवार) जळगावच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना ठाकरेंनी केलेल्या टीके विषयी विचारले असता त्यांनी अवघा एक शब्द उच्चारला 'बोल बच्चन'. फडणवीस म्हणाले, बोल बच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही.

काहीही झालं तरी मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात घेणारच आहोत. मराठी माणसाच्या ताब्यात मुंबई गेली तर मालकाचं कसं होणार. मालकाच्या मित्राचं कसं होणार म्हणून मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये. म्हणून शेठजीचे नोकर प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी मुंबईतील सभेत देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केला होता.

Devendra Fadnavis uddhav Thackeray Raj Thackeray
Karnataka Maharashtra border dispute : सीमाप्रश्‍नी उच्चाधिकार समितीची पुनर्रचना; CM फडणवीसांचे कोल्हापूर-सांगलीला झुकते माप

चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंवर थेट बोलणे मुख्यमंत्री फडणवीसांनी टाळले असले तरी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की. मोदीजी-अमितभाई- देवेंद्रजी यांच्यावर वैयक्तिक आरोप करणं सोपं आहे, पण हे नेते जेव्हा देशभर,राज्यभर दौरे करत होते, तेव्हा उद्धवजी मातोश्रीतून ऑनलाईन भाषण करत होते. हे महाराष्ट्रातील जनतेनं बघितलेलं आहे.‘शिव’ आणि ‘हिंदुत्व’ हे दोन आधारस्तंभही सोडून उद्धवजी तुम्ही सोनिया चरणी नतमस्तक झालात.

एकनाथ शिंदेंकडून टार्गेट

एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंना टार्गेट केले. ते म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत यांना गाठून टाकले आहे. युती करता युती करता का असे म्हणत ते मनसेसोबत युतीसाठी लाचार झाले आहेत.बाळासाहेबांचा ज्या काँग्रेसला विरोध होता त्यांनी त्या काँग्रेसकडे शिवसेना गहान टाकली होती, असे देखील शिंदे म्हणाले.

Devendra Fadnavis uddhav Thackeray Raj Thackeray
Nashik Loan Harassment: नाशिकमध्ये भाजपच्या नेत्यांकडून सावकारी, दुपटीने वसुलीसाठी कर्जदारांचा होतोय छळ!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com