

Mumbai News: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी बंड करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलं. गेल्या दीड-दोन वर्षांपासून ज्या ऑपरेशन टायगरची चर्चा आहे, त्यावर खऱ्या अर्थानं शिक्कामोर्तब झालं. या ऑपरेशन टायगरबाबतच्या अनेक गोष्टींचा हळूहळू उलगडा होत आहे. आता ठाकरेंच्या सहाही खासदारांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच जाहीर मोठी कबुली दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या बंडखोर खासदारांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, हे खरं आहे की, त्यातल्या एक दोन लोकांनी इच्छा पण प्रदर्शित केली की, आम्हाला भाजपमध्ये यायचं. पण आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की, आमच्याकडे सध्या व्यवस्था नसल्याचं सांगितलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्पष्टच सांगायचं झालं तर आम्ही आमचं दार बंद ठेवलं होतं. आम्ही या कोणाही करता भाजपचं दार उघडलं नाही. कारण आमचं असं मत होतं की, त्यांना जर जायचं असेल तर त्यांनी शिवसेनेत जावं असंही फडणवीसांनी म्हटलं. कारण शिवसेना हा त्यांचाच पक्ष आहे. ते शिवसेनेतूनच निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेतच जावं. त्यामुळे भारतीय जनता पक्षातून आम्ही प्रयत्नही केला नसल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई तक या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी ऑपरेशन टायगरमागची इनसाईड स्टोरी सांगितली. हे खरं आहे की, खासदार-आमदार शिवसेनेतून शिवसेनेत जातील, एनसीपीतून एनसीपीत जातील हा अलिखित नियम समजा. असं नाही की, खूप मोठी राजकीय गरज आहे. शेवटी राजकारणातले नियम जे असतात, ते गरजेप्रमाणे ठरतात. खूप मोठी राजकीय काही गरज आ,हे तर यात काही परिवर्तन येईल. आज ती गरज नाही, त्यामुळे तो नियम चालला असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
मुख्यमंत्र्यांनी ऑपरेशन टायगरबाबत मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, पहिल्यांदा तर अशा प्रकारचे जे काही ऑपरेशन्स होतात त्यात काय घडलं, कोणी केलं, कसं केलं, या सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात. मी एवढंच म्हणेन की, मित्रपक्षानं ऑपरेशन केलं आणि मित्रपक्षाला आमचा योग्य तो पाठिंबा होता. त्यांना जी आवश्यक पडता पडली तेवढी मदत ही आमचा मित्रपक्ष म्हणून आम्ही केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.