PSI Exam : मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचा ऐतिहासिक निर्णय, पोलिसांना मोठा दिलासा; PSI परीक्षेचे बंद दरवाजे पुन्हा उघडले, 25 टक्के आरक्षणही

Maharashtra PSI Exam : राज्य सरकारने पोलिस दलातील खात्यांतर्गत परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मेहनती, कर्तव्यनिष्ठ आणि तरुण पोलिसांना PSI होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Maharashtra PSI Exam
Maharashtra PSI Examsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला.

  2. PSI पदासाठीची खातेअंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याची घोषणा झाली.

  3. 2022 पासून ही परीक्षा बंद होती.

  4. मेहनती, कर्तव्यनिष्ठ आणि तरुण पोलिसांसाठी PSI होण्याचा मार्ग मोकळा झाला.

  5. या निर्णयामुळे पोलिस दलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Mumbai News : राज्य सरकारने नुकताच मराठा समाजाबाबात मोठा निर्णय घेत हैद्राबाद गॅझेट लागु करण्याचे आदेश दिले. यामुळे मराठवाड्यातील लाखो मराठा बांधवांना त्याचा फायदा होणार आहे. दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस दलाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी शासनाने पोलिस उपनिरीक्षक पदासाठीची खातेअंतर्गत विभागीय परीक्षा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यामुळे मेहनती, कर्तव्यनिष्ठ आणि तरुण पोलिसांना PSI होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही परिक्षा फेब्रुवारी 2022 मध्ये बंद करण्यात आली होती.

राज्यातील पोलिस अंमलदारांसाठी मोठी घोषणा आज राज्यातील महायुती सरकारने केली. सरकारने पोलिस उपनिरीक्षक पदासाठी थेट खातेअंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पोलिस दलातील कमी वयातील अनेक मेहनती आणि अनुभवी पोलिस कर्मचाऱ्यांना आता सुवर्णसंधी चालून आली आहे.

Maharashtra PSI Exam
Mahayuti Controversy: जरांगेंनी दमछाक केल्यानंतर फडणवीसांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा तात्पुरता मिटवला,पण महायुतीत नाराजीचा उद्रेक...

राज्य सरकारने आणलेल्या या संधीमुळे कमी वयातच PSI पदावर जाऊन काम करण्याची संधी पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना मिळणारच आहे. तसेच पोलिस दलालाही तरुण आणि ऊर्जावान अधिकारी मिळण्यास मदत होणार आहे. दरम्यान पोलिस उपनिरीक्षक पदासाठीची खातेअंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्यासाठी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सतत्याने प्रयत्न केले होते. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी एप्रिल 2025 मध्ये पत्र व्यवहार केला होता. तसेच ही परीक्षा पुन्हा एकदा सुरू करण्यात यावी अशी मागणी केली होती.

पूर्वी पोलिस उपनिरीक्षक पदासाठीची खातेअंतर्गत विभागीय परीक्षा देताना किमान पाच वर्षांची सेवा पूर्ण असावी अशी अट होती. त्यामुळे पोलिस अंमलदारांना PSI पदासाठी 25 टक्के आरक्षणाच्या अंतर्गत ही परीक्षा देता येत होती. मात्र फेब्रुवारी 2022 च्या शासन निर्णयानुसार ही परीक्षा बंद झाली होती. पण मंत्री योगेश कदम यांनी हा विषय लावून धरल्याने परीक्षा पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे.

सध्याच्या घडीला पोलिस कॉन्स्टेबलना यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कालावधीतच प्रमोशनद्वारे PSI होण्याची संधी मिळतेय. यामुळे जादातर दोन किंवा तीन एक वर्षे त्यांना PSI म्हणून काम करता येते. पण आता विभागीय परीक्षेतून कमी वयातच PSI होण्याची संधी मिळणार आहे. अशा अधिकाऱ्यांना पुढील 20 ते 25 वर्षे PSI अथवा त्यापेक्षा वरिष्ठ पदांवर काम करता येणार आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे मेहनती, कर्तव्यनिष्ठ आणि तरुण पोलिस अंमलदारांना आता अधिकारी होता येणार आहे. त्यांना पुढे जाण्याची संधी मिळेल. या निर्णयामुळे पोलिस दलात नवे चैतन्य निर्माण होईल, असेही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलं आहे.

Maharashtra PSI Exam
Mahayuti Govt: शिक्षकांना बाप्पा पावला! महायुती सरकारचा मोठा निर्णय आला; तब्बल 52 हजार कर्मचाऱ्यांना होणार फायदा

FAQs :

१. ही खातेअंतर्गत PSI परीक्षा कोणासाठी आहे?
उत्तर: ही परीक्षा सध्या महाराष्ट्र पोलिस दलात सेवा बजावणाऱ्या मेहनती आणि पात्र कॉन्स्टेबल किंवा तत्सम पदावरील कर्मचाऱ्यांसाठी आहे. त्या त्यांना उपनिरीक्षक (PSI) पदावर पदोन्नती मिळवण्याची संधी देते.

२. ही परीक्षा पूर्वी का बंद करण्यात आली होती?
उत्तर: फेब्रुवारी २०२२ मध्ये, मागील सरकारने ही खातेअंतर्गत परीक्षा बंद केली होती. अचानक झालेल्या या निर्णयामुळे अनेक पोलिस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या आशेला धक्का बसला होता.

३. आता परीक्षा कधी होण्याची शक्यता आहे?
उत्तर: सध्या अधिकृतपणे फक्त परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. परीक्षेची अंतिम तारीख, अर्ज प्रक्रिया आणि अभ्यासक्रमासंबंधी अधिसूचना शासनाकडून लवकरच जारी केली जाण्याची अपेक्षा आहे.

४. यामुळे पोलिसांना काय फायदा होईल?
उत्तर: यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना थेट PSI पदावर पदोन्नती मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना आता बाह्य उमेदवारांसोबत खुल्या स्पर्धा परीक्षेची वाट न पाहता, अंतर्गत प्रोन्नतीद्वारे करिअरमध्ये प्रगती करता येईल.

५. बाह्य उमेदवारांसाठीची PSI भरती परीक्षा यावरून बंद होणार का?
उत्तर: नाही. खातेअंतर्गत परीक्षा ही अंतर्गत पदोन्नतीचा एक separate मार्ग आहे. बाह्य उमेदवारांसाठीची नवीन भरती करण्यासाठीची regulard PSI स्पर्धा परीक्षा सुरूच राहणार आहे. हे दोन वेगवेगळे मार्ग आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com