Ashok Kharat Case New Update :CM फडणवीसांचे 9 मंत्री अशोक खरातचे भक्त? बड्या नेत्याच्या आरोपाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ, प्रकरण आणखी तापणार?

Leader Alleges 9 Fadnavis Ministers Linked to Ashok Kharat : सीएम फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील 9 मंत्री अशोक खरातचे भक्त असल्याचा आरोप. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Ashok Kharat
Ashok KharatSarkarnama
Published on
Updated on

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात रोज नव नवे खुलासे होत आहेत. स्वतःला अध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून मांडणाऱ्या अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. तपासादरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत असून, या प्रकरणाचे पडसाद आता राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत.

यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी अत्यंत गंभीर आणि धक्कादायक दावे केले आहेत. राऊत म्हणाले, सध्याच्या मंत्रिमंडळातील तब्बल 9 मंत्री या भोंदूबाबाचे भक्त होते. हे मंत्री केवळ त्यांच्याकडे जाऊन अत्यंत घृणास्पद विधि करत होते, असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला आहे.

Ashok Kharat
Ashok Kharat Case : रुपाली चाकणकरांनी स्वत:चे बोट कापले, सुषमा अंधारेंनी दाखवले भयंकर फोटो ; अटक करुन नार्को टेस्टची मागणी

अशोक खरातचा संबंध काही मोठ्या राजकीय नेते, अधिकारी आणि सेलिब्रिटी यांच्याशी असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्याने आपल्या प्रभावाचा वापर करून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवल्याचाही आरोप केला जात आहे. या सर्व प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संपूर्ण घडामोडींची तुलना आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या “एपस्टिन फाइल्स” प्रकरणाशी केली. “जगात एपस्टिन फाइल्स आणि महाराष्ट्रात खरात फाइल्स,” असे वक्तव्य केले आहे.

Ashok Kharat
Captain Ashok kharat: रूपाली चाकणकरांना पुन्हा दणका, माजी सहकारी म्हणाली, वाट कसली बघता, नैतिकता असेल तर लगेच राजीनामा द्या!

हे संपूर्ण प्रकरण भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेशी जोडलेले असल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. राऊत यांनी केलेल्या या दाव्यामुळे सत्ताधारी गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, आता हे 9 मंत्री नेमके कोण आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची तयारी केली असून, आगामी काळात हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्र्यांवर अशा प्रकारचे वैयक्तिक आणि गंभीर आरोप होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com