kunal kamra : कॉमेडियन कुणाल कामराचा माफी मागण्यास नकार; अजितदादांच्या जुन्या विधानाकडे बोट

kunal kamra On Ekath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडावर वादग्रस्त भाष्य कॉमेडियन कुणाल कामराने केलं होतं. त्यानंतर त्याच्या स्टुडिओची शिवसैनिकांनी तोडफोड केली होती. तर त्याने माफी मागावी अशी माघणी केली होती.
Kunal Kamra
Kunal Kamrasarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : स्टँडप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावेळी त्यांने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडावर भाष्य केल्याने त्याला शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. संतप्त झालेल्या शिवसैनकांनी त्यांच्या स्टुडिओची तोडफोड शिवसैनिकांनी केली आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर आता समन्स देखील जबावला आहे. तर तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांवरही गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आता कुणाल कामराने माफी मागणार नाही अशी ठाम भूमीका घेतली आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपली भूमीका मांडली आहे. तसेच जे अजित पवार म्हणाले तेच आपण म्हणालो असून माफी मागणार नाही, असेही म्हटलं आहे.

कुणाल कामराने मुंबईच्या खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये एका कॉमेडी शो दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यावर हिंदी गाण्यांचं रिमिक्स केलेलं गाणं म्हटलं. या व्यगांत्मक गाण्यावरूनच मोठा गदारोळ झाला. सभागृहातही याचे पडसाद उमटले. तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या क्लबची तोडफोड केली. यावरून कामरासह मोडतोड करणाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर कुणाल कामराने एक पोस्ट करत केली आहे. यात त्याने हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केल्याचा निषेध केला. तो म्हणाला. हॅबिटॅट हा एक मनोरंजनाचा मंच आहे. हॅबिटॅट माझ्या विनोदासाठी जबाबदार नाही. तसेच माझं बोलणं आणि कृती यावरही कोणाचंही नियंत्रण नाही.

एका विनोदी कलाकाराच्या शब्दावरून एखाद्या ठिकाणावर हल्ला करणे तितकेच मूर्खपणाचे आहे जितके तुम्हाला दिलेले बटर चिकन आवडले नाही म्हणून टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटवण्याचाच हा एक प्रकार आहे, असा चिमटा कुणालने काढला आहे.

Kunal Kamra
Ambadas Danve On Kunal Kamra : फडणवीस म्हणतात, माफी मागा तर दानवे म्हणाले, गरज नाही! कुणाल कामराच्या गीताने राजकीय सूर बिघडले...

पण अशा पद्धतीने कोणी मला धडा शिकवण्याच्या धमक्या देत असेल तर मी याला भीक घालत नाही. मी याला घाबरत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार असून तो कोणा एका श्रीमंतांकडे किंवा राजकारण्यांचा नाही. अशा पद्धतीने माझ्यावर दबाव आणून काहीही परिणाम होणार नाही. मी कायद्याच्या विरोधात काहीही वागलेलो नाही. कायद्यात एखाद्या राजकारणावर भाष्य करू नये असे म्हटलेलं नाही. त्यामुळे मी माफी मागणार नाही. मी जे म्हटलं तेच नेमकं अजित पवार एकनाथ शिंदेंबद्दल बोललं होते. त्यामुळे मी घाबरणार नाही आणि पलंगाखाली लपूनही बसणार नाही.

Kunal Kamra
Kunal Kamra Studio Attack : आधी तोडफोड करणाऱ्या उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यकर्त्यांवर FIR करा; अंजली दमानियांनी कायद्यानं घेरलं

तर पोलिसांना मी पूर्ण सहकार्य करणार असून न्यायालयास मी दोषी आहे असे वाटल्यास मी नक्की माफी मागेल. तसेच मुंबई महापालिकेने हॅबिटॅट स्टुडिओमध्ये पाडकाम कारवाई केली. त्यावरही त्याने भाष्य केले. कायदा सर्वांसाठी समान असतो. त्यामुळे हॅबिटटची मोडतोड कुठलीही नोटीस न देता कशी केली? असा सवालही त्याने महापालिकेला केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com