Shivsena Maharashtra News : आमच्या साधू-संतांच्या व्यसनमुक्ती प्रबोधनावर सरकार बिअर ओतणार वाटतं...

Marathwada News : बिअर विक्री वाढवण्यासाठी काय करता येईल ? यासाठी महाराष्ट्र सरकारने पाच आयएएस अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे.
Shivsena Maharashtra News
Shivsena Maharashtra NewsSarkarnama
Published on
Updated on

Ambadas Danve News : महाराष्ट्रात बिअरची विक्री कमी का झाली याचा अभ्यास करण्यासाठी सरकारने समिती नेमल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. बिअरची विक्री वाढवण्यासाठी काय करता येईल, याचा अभ्यास समिती करणार आहे. (Ambadas Danve News) सरकारच्या या निर्णायाबद्दल संताप आणि आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. विरोधकांनीही सत्ताधारी ट्रिपल इंजिन सरकारला धारेवर धरले आहे.

Shivsena Maharashtra News
Manoj Jagange Patil PC News : आता आमच्या गावात मंत्री, खासदार, आमदारांनी यायचंच नाही...

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या निर्णयावर संताप व्यक्त करताना सरकारला खडेबोल सुनावणारी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra) महाराष्ट्रात बिअरची कमी विक्री का होते याचा अभ्यास करून महाराष्ट्रात बिअर विक्री वाढवण्यासाठी काय करता येईल यासाठी महाराष्ट्र सरकारने पाच आयएएस अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे.

या समितीमध्ये बिअर असोसिएशनच्या एका प्रतिनिधींचाही समावेश केला आहे. (Shivsena) मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत यासाठी यांना समिती गठित करण्याची आवश्यकता भासू नये हेच दुर्दैव आहे महाराष्ट्राचे...! (Eknath Shinde) रेशनवर बिअर वाटली तर घरोघरी दारू पिणारे तयार होतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमच्या साधू संतांनी केलेल्या प्रबोधनावर, गाडगे बाबांनी केलेल्या व्यसनमुक्ती प्रबोधनावर बियर ओतनार वाटतं सरकार, असा टोला दानवे यांनी लगावला. जनता आंधळी कोशिंबीर खेळण्यात व्यस्त असल्याने सरकार बिनधास्त समाज विघातक निर्णय घेण्याची हिंमत करू लागले आहे. पिओ बिअर....करो सरकार को चिअर, असाच हा प्रकार असल्याची टीका दानवे यांनी केली. सरकारच्या या निर्णयानंतर समाज माध्यमातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. बिअर महत्त्वाची की शाळा ? शिंदे सरकारचा उपक्रम, बियर आपल्या दारी, अशा शब्दांत सरकारची खिल्ली उडवली जात आहे.

दरम्यान, नुकताच राज्य सरकारने कंत्राटी नोकर भरतीचा अध्यादेश रद्द केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी नोकर भरतीचे पाप महाविकास आघाडी सरकारचेच असल्याचा आरोप करत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी नाक घासून जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली होती. कंत्राटी नोकरभरतीच्या अध्यादेशावरून राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार बॅकफूटवर आल्याचे दिसले. आता राज्यातील बिअरची विक्री वाढवण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीमुळे सरकारवर चोहोबाजूंनी टीका होताना दिसते आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com