MVA V/S Mahayuti : गेल्या सरकारच्या तुलनेत राज्यात महिला अत्याचारांची संख्या घटतीच !

Crime News : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारी पाहिली तर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या काळातील दैनंदिन सरासरी घटनांची संख्या 126 इतकीच असल्याचे लक्षात येते.
Mahavikas Aghadi-Mahayuti
Mahavikas Aghadi-MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बदलापूरच्या घटनेनंतर राज्यात क्षोभ उसळला आहे. राज्याच्या विविध भागांतून आता महिला अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारी पाहिली तर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या काळातील दैनंदिन सरासरी घटनांची संख्या 126 इतकीच असल्याचे लक्षात येते.

या पार्श्वभूमीवर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारी पाहिली तर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या काळातील दैनंदिन सरासरी घटनांची संख्या 126 इतकीच असल्याचे लक्षात येते. 2021 या कोविडच्या लॉकडाऊन काळात सुद्धा महाराष्ट्रात प्रतिदिवशी 109 महिला अत्याचाराच्या घटना घडत होत्या. विशेष म्हणजे जानेवारी ते जून 2022 या काळात ज्या सरासरी 126 घटना प्रतिदिवशी घडत होत्या, तितक्याच घटना म्हणजे प्रतिदिन 126 इतकीच संख्या आजही आहे. (MVA V/S Mahayuti News)

बदलापूरची घटना आणि त्यानंतर महाविकास आघाडीने (MVA) केलेले आंदोलन यामुळे राजकीय नेत्यांच्या दररोज येणार्‍या प्रतिक्रिया यामुळे एकूणच जनमानस ढवळून निघाले आहे, असे एनसीआरबीच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता लक्षात येते. 2020 या लॉकडाऊनच्या वर्षांत महाराष्ट्रात 31,701 महिलांवर अत्याचार झाले, त्याची सरासरी 88 घटना प्रतिदिवशी इतकी होती. 2021 हे सुद्धा लॉकडाऊनचेच वर्ष होते.

या वर्षात महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटनांची संख्या अचानक 39,266 वर पोहोचली आहे. या आकडेवारीनुसार याची सरासरी 109 घटना प्रतिदिवशी इतकी असल्याचे दिसते. जानेवारी ते जून 2022 या काळात महाविकास आघाडीच्या काळात एकूण 22 हजार 843 महिला अत्याचाराच्या घटना घडल्या. त्याची सरासरी 126 घटना प्रतिदिवस इतकी असल्याचे दिसते.

राज्यात 30 जून 2022 रोजी महायुतीचे (Mahayuti) सरकार आले. जुलै ते डिसेंबर 2022 या 6 महिन्यात 20,830 घटना घडल्या. याची सरासरी 116 घटना प्रतिदिवस इतकी येते. आता 2023 मध्ये 2022 इतक्याच घटना असून, त्याची सरासरी सुद्धा 126 घटना प्रतिदिवस इतकी येते. कोविड काळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना जी सरासरी होती, तितक्याच घटना आज महाराष्ट्रात होत आहेत, असा याचा अर्थ होतो.

Mahavikas Aghadi-Mahayuti
NCP News : विकास कामांवरून पटेल यांची अनिल देशमुखांवर टोलेबाजी

यातही अल्पवयीन मुलींवरचे अत्याचाराचे प्रयत्न (पॉक्सो कलम 12, भादंवि 509) या श्रेणीतील गुन्हे पाहिले तर त्यात अचानकच 2021 पासून मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. हे गुन्हे 2017 मध्ये 94, 2018 मध्ये 48, 2019 मध्ये 94, 2020 मध्ये 48 इतके होते. ते 2021 पासून अचानक वाढले आणि ती संख्या 249 वर पोहोचली. 2022 मध्ये ही संख्या 332 इतकी आहे. यातील जून 2022 पर्यंत राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर होते आणि अनिल देशमुख गृहमंत्री होते.

एकीकडे हा कल दिसत असताना 18 वर्षांपेक्षा वरील मुलींच्या विनयभंगाच्या गुन्ह्यांची संख्या कमी झालेली दिसून येते. 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात 1317 गुन्हे नोंदले होते, ते 2023 मध्ये 1208 इतके नोंदले गेले.

महिलांवरील भादंवि 354 चे गुन्हे वाढण्याचा एक पॅटर्न आहे. साधारणत: 700 ते 900 इतक्या संख्येने दरवर्षी त्यात वाढ होते. पण, असे असताना काही श्रेणीतील गुन्ह्यांमध्ये घट होताना आकडेवारीनुसार दिसून येत आहे. महिलांशी संबंधित सायबर गुन्ह्यांची संख्या 2022 मध्ये 116 वर गेली होती, ती 2023 मध्ये 79 इतकी खाली आली आहे.

Mahavikas Aghadi-Mahayuti
Ajit Pawar News : दादांनी दिला बहिणींना पाच वर्षांचा वादा

मुंबईच्या विचार केला तर पॉक्सोच्या अंतर्गत कलम 4 आणि 6 अंतर्गत बलात्काराचे नोंदले गेलेले गुन्हे कमी झालेले आहेत. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा मुंबईत 2020 मध्ये 445 बलात्कार झाले. 2021 या लॉकडाऊनच्याच वर्षी अल्पवयीन मुलींवर बलात्कार होण्याचे प्रमाण 524 इतके होते. 2022 मध्ये ही संख्या 615 वर पोहोचली आणि 2023 मध्ये ती कमी होऊन 590 वर आली, असे एनसीआरबीची आकडेवारी सांगते.

वर्ष............................. महिला................... अत्याचाराच्या घटना सरासरी/प्रतिदिन

2020 31,701 (कोविड काळ) 88 घटना

2021 39,266 (कोविड काळ) 109 घटना

जानेवारी ते जून 2022 22,843 126 घटना

जुलै ते डिसेंबर 2022 20,830 116 घटना

2023 45,434 126 घटना

Mahavikas Aghadi-Mahayuti
Sushma Andhare News : सुषमा अंधारेंचा मतदारसंघ ठरला ! 'या' जागेवरून विधानसभा निवडणूक लढणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com