काँग्रेस आणि राष्ट्रवादीची खंबीर साथ हेच माझ्या लोकप्रियतेचे गमक

BMC Election 2022 : मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव
uddhav thackeray - ajit pawar
uddhav thackeray - ajit pawarsarkarnama

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याहस्ते आज मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. या सुविधेमुळे आता मुंबईकरांना महापालिकेच्या ८० पेक्षा जास्त सुविधा मोबाईल ८९९९-२२-८९९९ या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे मिळणार आहेत. विशेष गोष्ट म्हणजे २४ तास ही सुविधा उपलब्ध असणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

यासोबत कार्यक्रमावेळी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधकांवर चौफेर टोलेबाजी केली तसेच सरकारमधील सहकारी पक्ष काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) कौतुकाचा वर्षाव देखील केला. या कार्यक्रमाला मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh), मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar), महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल, व्हॉट्सॲपचे संचालक (सार्वजनिक धोरणे) शिवनाथ ठुकराल हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे याप्रसंगी उपस्थित होते.

uddhav thackeray - ajit pawar
राष्ट्रवादीच्या नादी लागून शिवसेना घेतेय तोंड फोडून; मुख्यमंत्र्यांचा चार्ज कोणाकडे तरी द्या...

कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षाची सुरुवात खुप चांगली झाली असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ५०० चौ.फुटाच्या घरांवरील घरपट्टी माफ, मग कोस्टलरोडचा मावळाने पूर्ण केलेला बोगदा आणि आज मुंबईकरांना ८० सुविधा बोटाच्या टीपेवर मिळणे, ही सगळी चांगली कामे वर्षाच्या सुरुवातीलाच झाली आहेत. शासकीय, प्रशासकीय कारभाराबद्दल बोलतांना तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही असा गैरसमज आहे. परंतू त्याला छेद देणारा आजचा उपक्रम असल्याचेही त्यांनी सांगितले.

विरोधकांवर प्रहार करताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मत मागतांना वाकणारी, झुकलेली माणसं मत मिळाल्यानंतर ताठ होतात पण ज्यांना लोकांसाठी काम करायचे असते ती नेहमीच विनम्र असतात. तसेच स्वत: काही करायचे नाही पण महापालिका काय करते हा प्रश्न काहीजण नेहमी उपस्थित करतात, असे म्हणत त्यांनी भाजपवर नाव न घेता टीका केली. यावेळी ठाकरे यांनी "माझे महापालिकेतील आणि सरकारमधील सहकारी भक्कमपणे काम करत असल्याने मी लोकप्रिय मुख्यमंत्री. त्यांची साथ असल्याने मुंबईचे कौतूक जागतिकस्तरावर. मी त्यांना नम्रपणे नमस्कार करतो. पुढच्या कोणत्याही कामासाठी जिथे सरकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे ते देण्याचे मी वचन देतो", असे म्हणत सरकारमधील सहकाऱ्यांचे कौतुकही केले.

uddhav thackeray - ajit pawar
अखिलेश यादवांचे 'मेला होबे'! BJP ला चितपट करण्यासाठी बंगालच्या धर्तीवर प्लॅन

यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, डॉ. इक्बालसिंह चहल यांनी देखील मनोगत व्यक्त केले. नागरिकांना ८० सेवा सुविधांचा लाभ घरी बसून मिळणे ही निश्चित कौतूकास्पद गोष्ट आहे, देशात असा उपक्रम सुरु करणारी बहृन्मुंबई महानगरपालिका पहिली महापलिका असे म्हणत सर्वांनी मुंबई महापालिकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com