Congress Politics : विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसचा मोठा निर्णय, 'या' नेत्यांवर महाराष्ट्राची जबाबदारी

Congress Politics incharge secretary : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून नव्या प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, पूर्वीच्या प्रभारींना पदमुक्त करण्यात आले आहे.
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

Congress Politics : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तयारीला लागली आहे. काँग्रेसकडे 288 मतदारसंघातून दीड हजार पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज आले आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेसला 80 ते 85 जागा मिळतील, असा काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हेचा अंदाज आहे. आता काँग्रेसने राज्य प्रभारीच्या बाबत मोठा निर्णय घेतलाय.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून नव्या प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, पूर्वीच्या प्रभारींना पदमुक्त करण्यात आले आहे.

संपत कुमार, आशिष दुवा, सोनम पटेल यांच्या जागी बी. एम. संदीप, कावाझी निजामुद्दीन, कुणाल चौधरी, यु बी व्यंकटेश यांची प्रभारीपदी ‌नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

Congress
Eknath Shinde : पुतळा कोसळल्याप्रकरणी CM शिंदेंचा मोठा निर्णय, नौदलाचे अधिकारी पवन धिंगरांवर 'ही' जबाबदारी

विजयाचा आत्मविश्वास

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर विधानसभेसाठी काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येणार, असे काँग्रेस नेते सांगत आहेत. विधानसभेत महाविकास आघाडीत जास्तीत जास्त जागा लढण्याचा काँग्रेस नेत्यांचा आग्रह आहे.

ठाकरेंच्या मागणीकडे दुर्लक्ष

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र, काँग्रेसने ही मागणी फेटाळली आहे. आधी महायुतीचा पराभव करू आणि नंतर मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा ठरवू, असे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.

विदर्भात काँग्रेसला सर्वाधिक जागा

विदर्भामध्ये विधानसभेच्या 62 जागा आहेत. महाविकास आघाडीत लढताना विदर्भातील सर्वाधिक जागा या काँग्रेसला मिळाव्यात असा काँग्रेस नेत्यांचा आग्रह आहे. ज्या भागात ज्या पक्षाची ताकद असेल त्यानुसार जागा वाटप होणार असल्याचे महाविकास आघाडीतील नेते सांगत आहेत. त्यामुळे मुंबईत ठाकरे गटाला तर विदर्भात काँग्रेसला तर पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाला अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे.

Congress
Jitesh Antapurkar News : मराठवाड्यात काँग्रेसला मोठा झटका; आमदार जितेश अंतापूरकरांची पुढची वाटचाल ठरली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com