Congress New District Presidents : काँग्रेसने भाकरी फिरवली! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्याआधीच तब्बल 13 जिल्ह्यांना नवे नेतृत्व

Congress Reshuffles Leadership in 13 Districts Ahead of Local Elections : नवी मुंबई, धुळे शहर, ग्रामीण, अहिल्यानगर शहर, सातारा, सोलापूर जिल्ह्याला नवे नेतृत्व दिले आहे. नव्या जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
New district presidents appointed by Congress in Maharashtra
New district presidents appointed by Congress in MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Congress Party Reshuffle: आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या जागांवर नवे नेतृत्व दिले आहे. तसेच 13 जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचे गणित डोळ्यासमोर ठेऊन या नियुक्त्या केल्या गेल्याच्या मानले जात आहे.

नवी मुंबई, धुळे शहर, ग्रामीण, अहिल्यानगर शहर, सातारा, सोलापूर जिल्ह्याला नवे अध्यक्ष मिळाले आहेत. नवीन अध्यक्षांच्या निवडीमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसते आहे. मराठवाड्यातील लातूर, संभाजीनगर, नांदेडमध्ये नियुक्ता करत काँग्रेसला पुन्हा मजबूत करण्याच्या दृष्टिने पाऊल टाकले गेले असल्याचे मानले जात आहे.

मराठवाड्याकडे विशेष लक्ष

कधीकाळी मराठवाडा हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना काँग्रेसची पक्षसंघटना मराठवाड्यात मजबूत होती. मात्र, येथे काँग्रेसला आता मोठे धक्के बसत आहेत.

एका मागून एक मोठे नेते भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरत आहेत. त्यामुळे पुन्हा नांदेड, लातूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करत पक्षसंघटना मजबूत करण्यावर लक्ष देण्यात आले आहे.

यामध्ये लातूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी अभय साळुंखे, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोंगावकर तर नांदेड उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी राजेश पवाडे यांच्यावर देण्यात आली आहे.

New district presidents appointed by Congress in Maharashtra
Sunil Kedar News: माजी मंत्री सुनील केदारांना मोठा झटका; जिल्हा बँकेपाठोपाठ आता बाजार समितीतील वर्चस्वही संपुष्टात येणार

जिल्हा -> नवीन अध्यक्ष

  • नवी मुंबई -> पूनम मितून पाटील

  • धुळे शहर -> साबिर शेख

  • धुळे ग्रामीण -> प्रविण बापू चौरे

  • अहिल्यानगर शहर -> दीप चव्हाण

  • सातारा -> रंजीत देशमुख

  • सोलापूर ग्रामीण -> सातलिंग अण्णाराव शाटगर

  • हिंगोली -> सुरेश सराफ

  • लातूर ग्रामीण -> अभय साळुंखे

  • दक्षिण रत्नागिरी -> नारोददीन सय्यद

  • उत्तर रत्नागिरी -> सोनलक्ष्मी विरधवल घाग

  • छत्रपती संभाजीनगर ग्रामीण -> किरण पाटील डोंगावकर

  • नांदेड उत्तर -> राजेश पवाडे

  • नागपूर ग्रामीण -> अश्विन दिलीप बाईस

New district presidents appointed by Congress in Maharashtra
Nagpur beer bar file signing : नागपूरच्या 'बार'मधील सरकारी फाईल महाराष्ट्रभर 'घुमली'; सही करणारा अधिकारी 'सार्वजनिक'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com