Walmik Karad : 'कराड दाऊदच्या बरोबरीचाच'; काँग्रेस नेत्याची सडकून टीका

Vijay Wadettiwar on Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केला. तर त्याचा एन्काऊंटर होऊ शकतो, असा खळबळजनक दावा गेल्याच आठवड्यात करण्यात आला होता.
Chief Minister Devendra Fadnavis
Chief Minister Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Beed Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याने शरणागती पत्करल्यानंतर आला नवनवीन माहिती येत आहे. सध्या सीआयडी आणि एसआयटी तपास करत असून विरोधकांनी सरकारला धारेवर धरल आहे. अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वाल्मिक कराडच्या बाबतीत टीकेचे झोड उठवली आहे. वडेट्टीवार यांनी वाल्मिक कराडची तुलना डॉन दाऊद इब्राहिमशी केली आहे. तसेच वडेट्टीवार यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे.

वडेट्टीवार यांनी बीडमधील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरले आहे. तसेच टीका करताना मंत्री धनंजय मुंडेवर हल्लाबोल करणे थांबवलेले नाही. आताही त्यांनी मुंडे यांच्यावर टीका करताना, मुंडे बोले तैसे पोलीस दल हाले, अशी अवस्था बीडमध्ये झाल्याची टीका केली आहे. तसेच येथील एकही पोलिस भाऊंच्या शब्दाबाहेर नाही, यामुळे येथे खून जरी झाला तरी त्याची नोंद आकस्मित मृत्यू अशी नोंद होईल, पोलिस इमानदारीने भाऊंची शब्द पाळतात, असेही टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

तर वाल्मिक कराडवर निशाना साधताना, कराड म्हणजे दुसरा दाऊद इब्राहिम असल्याचे दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील सर्व तपास योग्य करायचा असेल, सगळे धागे दोरे शोधायचे असतील. तर पोलिसांना तळापर्यंत जायला हवं. यासाठी पोलिसांनी कराडचा एक महिन्याचा पीसीआर घेतला पाहिजे. येथे एका वर्षात 110 पेक्षा अधिक खून होतातच कसे असा सवाल उपस्थित केलाय. तर बीडमधील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी कडक कारवाई व्हायला हवी. मात्र ती देखील होताना दिसत नसल्याची खंत वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली आहे.

Chief Minister Devendra Fadnavis
Santosh Deshmukh Murder Case : जनआक्रोश मोर्चात आमदार सुरेश धस यांना 'नो एन्ट्री'; 'मोठं' कारण आलं समोर

मुख्यमंत्री म्हणत असतात की कोणाची गय केली जाणार नाही, दोषींना सोडणार नाही. पण महाराष्ट्राचा जो बिहार झालाय, तो संपवण्याची दिसत त्यांची मानसिकता दिसत नसल्याची आरोप देखील वडेट्टीवार यांनी केला आहे.

यावेळी वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी केली. तर जोपर्यंत मुंडे राजीनामा देत नाहीत, वाल्मिक कराडवर खुणाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत या प्रकरणात न्याय मिळणार नाही, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तर वाल्मिक कराड हा दाऊद इब्राहिमच्या बरोबरीचा असून बीडमधील पोलीस दलावर धनंजय मुंडे यांचं नियंत्रण आहे.

Chief Minister Devendra Fadnavis
Santosh Deshmukh Murder Case : ''महाराष्ट्राला यातून एक उदाहरण मिळणार'' ; मुख्यमंत्र्यांची भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं सूचक विधान!

बीडसोबतच पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजारा उडाला असून आपण कोणाविरोधात बोलत नसून कोणाचेही समर्थन करत नसल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. कायदा आणि सुव्यस्था राखण्याची जबाबदारी पोलीस आयुक्तांची असून खुणाच्या घटना, ड्रग्ज विक्री केली जात आहे. बीडसह पुण्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. गुंड बाहेर येऊन पुण्यात स्वतःची मिरवणूक काढतात. यामुळे पुण्यात राजकीय स्वरुप न देता कडक शिस्तीचा पोलीस कमिशनर अजित पवारांनी आणावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com