Vijay Wadettiwar : दोन लेकरांचे मृतदेह आई-वडिलांनी खांद्यावर नेले घरी! फडणवीस, आत्राम… तुम्ही हेलकॉप्टरमधून जमिनीवर उतरा!  

Devendra Fadnavis DharmaraoBaba Atram Gadchiroli News : विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर टीका केली आहे.
Dharmarao Baba Atram, Devendra Fadnavis
Dharmarao Baba Atram, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : गडचिरोलीतील एक हृदय पिळवटून टाकणार व्हिडिओ समोर आला आहे. दोन मुलांचे मृतदेह आई-वडील खांद्यावर घेऊन घरी जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने आई-वडिलांवर ही वेळ आल्याचा दावा केला जात आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत या घटनेची माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर टीका केली आहे. दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील असल्याची माहिती देताना त्यांनी व्हिडिओही पोस्ट केला आहे.

Dharmarao Baba Atram, Devendra Fadnavis
Matoshree Sugar Factory: शेतकऱ्यांची एकजूट पाहून पोलिसांनी काढता पाय घेतला...

काय म्हणतात वडेट्टीवार?

आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. वेळेत उपचार मिळाले नाही. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. आईवडिलांनी दोन्ही भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेतले. चिखलातून वाट शोधत 15 किलोमीटर दूर अंतरावरचे अहेरी तालुक्यातील पत्तीगाव पायीच गाठल्याचे वडेट्टीवारांनी म्हटले आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव आज पुन्हा पुढे आल्याचे सांगताना त्यांनी फडणवीस आणि आत्राम यांच्यावर निशाणा साधला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा. हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ.

Dharmarao Baba Atram, Devendra Fadnavis
MCD Election : दिल्लीत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; निवडणुकीत ‘आप’ला मोठा धक्का

दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असतात. दोघांनी एकदा जमिनीवर उतरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकं कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे, अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com