Video Congress Politics : 'छोटा भाऊ मोठा भाऊ वादात पडू नका', दिल्लीतून काँग्रेस नेत्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे

Congress Rahul Gandhi and Mallikarjun Kharge : महाराष्ट्रातील नेत्यांनी नुकतीच दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. दिल्लीत झालेल्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी गटबाजी खपवून घेतली जाणार नसल्याची देखील सक्त ताकीद दिली आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Congress Political News : लोकसभा निवडणुकीत राज्यात यश मिळाल्याने काँग्रेस नेत्यांचा काॅन्फिडन्स वाढला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आपण मोठा भाऊ असल्याचे काही नेते सांगत आहेत.

मात्र, दिल्लीतील बैठकीत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचे शीर्षस्थ नेत्यांनी कान टोचले. लहान भाऊ मोठा भाऊ या वादात पडू नका. त्यावर भाष्य देखील करू नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या. तसेच अधिवेशनात आक्रमक भूमिका घेण्याचे देखील सांगितले आहे.

महाराष्ट्रातील नेत्यांनी नुकतीच दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. त्यावेळी अंतर्गत वादापासून निवडणुकीच्या संदर्भातील सर्व प्रश्नाची उत्तरे वरिष्ठांनी दिली. तसेच गटबाजी खपवून घेतली जाणार नसल्याची सक्त ताकीद देखील दिली आहे.

पावसाळी अधिवेशनात आक्रमकपणे मुद्दे मांडा. राज्य सरकारची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढा. राज्य सरकारचा कारभार भ्रष्ट असल्याचा संदेश जनतेमध्ये जाऊ द्या, अशा सूचना केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील नेत्यांना बैठकीत दिल्या आहेत. तसेच अंतर्गत वाद देखील सोडवण्यास सांगितले आहे.

Rahul Gandhi
Maharashtra Assembly Session 2024: विरोधकांना चितपट करण्यासाठी महायुती सरकार अधिवेशनात 'हा' डाव टाकणार?

चेन्निथला महाराष्ट्रात येणार

काँग्रेसमधील Congress मुंबईतील वाद चव्हाट्यावर आला आहे. काही नेत्यांनी वरिष्ठांची भेट घेत वर्षा गायकवाड यांच्या विरोधात तक्रार केली होती. राज्यात नेत्यांमध्ये असलेले अंतर्गत वाद मिटवण्यासाठी तसेच आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथला हे जुलैच्या पहिल्या आठवड्यात येणार असल्याची माहिती आहे.

गटबाजी खपवून घेणार नाही

पक्षांतर्गत कशा कुरघोड्या सुरू आहेत, याची आम्हाला माहिती आहे. पक्षातील गटबाजी खपवून घेणार नाही, असे स्पष्ट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी सांगितले आहे. तर, अंतर्गत गटबाजी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा, असा सूचना राहुल गांधी Rahul Gandhi यांनी दिल्या आहेत.

Rahul Gandhi
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचे शिलेदार तीन मुद्यांवरुन शिंदे सरकारला जेरीस आणणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com